पिंपरी-चिंचवड

तळेगावात पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी चाचपणी

CD

तळेगाव स्टेशन, ता. १९ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सध्याच्या ३ पोलिस उपायुक्त परिमंडळांची पुनर्रचना करून पोलिस उपायुक्त परिमंडळ-४ हे नव्याने निर्माण करण्यात आले आहे. नवनिर्मित परिमंडळ-४चे पोलिस उपायुक्त कार्यालय तळेगाव दाभाडे परिसरात थाटण्याचे पोलिस प्रशासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने परिमंडळ-४ पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी सोईस्कर आणि सुसज्ज जागा उपलब्ध होण्यादृष्टीने तळेगाव दाभाडे परिसरात चाचपणी करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत वाढता व्याप लक्षात घेता अंतर्गत पुनर्रचना करून परिमंडळ-४ पोलिस उपायुक्त कार्यालयाची नुकतीच निर्मिती करण्यात आली आहे. श्वेता खेडकर यांची परिमंडळ-४ च्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्त देहूरोड विभागांतर्गत शिरगाव-परंदवाडी, देहूरोड, चिखली ही ३ पोलिस ठाणी तसेच सहायक पोलिस आयुक्त महाळुंगे एमआयडीसी विभागांतर्गत तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, उत्तर महाळुंगे एमआयडीसी आणि दक्षिण महाळुंगे एमआयडीसी ही ४ पोलिस ठाणी अशी एकूण ७ पोलिस ठाणी परिमंडळ-४ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

मध्यवर्ती ठिकाणाला प्राधान्य
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पश्चिमोत्तर पट्ट्यात मुख्यत्वे कार्यक्षेत्र असलेल्या परिमंडळ-४च्या पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून तळेगाव दाभाडे परिसरात चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, परिमंडळ-४ च्या उपायुक्त श्वेता खेडकर, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त गणेश इंगळे, सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम, सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर, तळेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात आणि इतर अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १७) तळेगाव दाभाडे येथे परिमंडळ-४च्या कार्यालयासाठी प्रस्तावित जागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
नवनिर्मित परिमंडळ-४च्या पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी एखादी तयार इमारत तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर घेऊन तेथून त्वरित कारभार सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. परिमंडळ-४च्या भविष्यातील कायमस्वरूपी प्रशासकीय इमारतीसाठी चाकण रस्त्यावरील परुळेकर विद्या निकेतनलगत आरक्षित असलेला ७ गुंठ्यांचा भूखंड अथवा भंडारा डोंगर पायथ्याशी असलेल्या शासकीय गायरान भूखंडाचा देखील पर्याय समोर येऊ शकतो. सध्या तरी तात्पुरत्या कार्यालयासाठी चाकण रस्त्यावरील योजनानगर तसेच इतर काही ठिकाणच्या तयार इमारतींची पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यापैकी सर्वात सोईस्कर ठिकाणावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पोलिस प्रशासनाची मजबूत होणार
नवनिर्मित परिमंडळ-४चे पोलिस उपायुक्त कार्यालय तळेगाव दाभाडे परिसरात झाल्यास पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत समावेश असलेल्या मावळ आणि खेड तालुक्यातील स्थानिक ७ पोलिस ठाण्यांच्या प्रशासकीय सोईसह तळेगावातील कायदा सुव्यवस्थेवर पोलिस प्रशासनाची पकड आणखी मजबूत होईल, अशी पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

Solapur Political : जशा निवडणूका येतील तशी पात्र आणि चित्र बदलणारी चित्राताईं- भगीरथ भालके!

Pune Crime : तरुणीने केले जिवाभावाच्या मैत्रिणीवर चाकूने वार; कोरेगाव पार्क परिसरातील घटना!

SCROLL FOR NEXT