पिंपरी-चिंचवड

दारू पिण्याच्या पैजेतून मावळात युवकाचा मृत्यू

CD

तळेगाव स्टेशन, ता. ८ : नववर्ष स्वागतासाठी आयोजित पार्टीत पैज लावून मित्राला कोरी दारू पाजली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात फेकला. नवलाख उंबरे, ता. मावळ येथे घडलेली घटना तब्बल आठवडाभराने उघडकीस आली.
रामकुमार साह (अंदाजे वय ३०, सध्या रा. नवलाख उंबरे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, या प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कृष्णा सिंह (३५, नवलाख उंबरे, मूळ रा. बिहार) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार विकासकुमार हा फरार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘रामकुमार आणि दोघे आरोपी ३० डिसेंबरला मद्यपान करत होते. दरम्यान, नववर्ष स्वागतासाठी दारू देण्याचे आमिष दाखवत कोरी दारू प्यावी लागेल अशी त्यांच्यात पैज लागली. त्यावेळी रामकुमारने अतिप्रमाणात मद्यसेवन केले. पण, वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार लपवण्यासाठी कृष्णा सिंह आणि विकासकुमारने रामकुमारचा मृतदेह एका शेतात फेकला. दरम्यान, दुर्गंध सुटल्याने शेत मालकाने बुधवारी (ता.७) पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी रामकुमारचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत कृष्णा याला ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याने झाल्या प्रकाराची माहिती दिली.’’ या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT