पिंपरी-चिंचवड

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची अवहेलना संपणार

CD

तळेगाव स्टेशन, ता. १२ : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘एनएच-५४८डी’ची अवहेलना संपण्याची चिन्हे आहेत. या रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणाचा कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाने श्री असोशिएट्स इन्फ्राव्हेंचर्स लि. या कंत्राटदारास बुधवारी (ता.सात) जारी केला. ४५ कोटी रुपयांच्या तरतुदीअंतर्गत ५४ किलोमीटर मार्गाचे काम केले जाणार आहे.
दिवसरात्र रहदारीने भरुन वाहणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाची खड्डे आणि बाजूपट्ट्यांअभावी दुरवस्था झाली आहेत. वारंवार अपघात आणि नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, एमआयडीसी कामगार आणि स्थानिक रहिवासी कमालीचे त्रस्त आहेत. ‘एमएसआयडीसी’कडून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-५४८डी वरील प्रस्तावित उन्नत महामार्गाच्या कामाला लागणारा किमान २-३ वर्षांचा अवधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील अपघात आणि वाहतूक कोंडीवर तात्पुरती उपायोजना म्हणून पुढे आलेल्या अस्तित्वातील रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या प्रस्तावाला गेल्या ऑक्टोबरमध्ये राज्य शासनाकडून प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागातर्फे राबववण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत श्री असोसिएट्स इन्फ्राव्हेंचर्स लि. या कंत्राटदाराने १.४७ टक्के कमी दराने भरलेली निविदा स्वीकृत करण्यात आली. त्यानुषंगाने प्रत्यक्ष कामासाठी ४३ कोटी ६२ लाख १० हजार सातशे वीस रुपये, टेस्टिंग व रॉयल्टीपोटी एक कोटी ७६ लाख ९८ हजार तीनशे चोपन्न रुपये अशा ४५ कोटी ३९ लाख नऊ हजार चौऱ्याहत्तर रुपयांच्या कामाचा आरंभ आदेश जारी करण्यात आला आहे.
काम पूर्ण करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तळेगाव-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहनधारक आणि स्थानिकांना नित्याची वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याकामी विशेष पाठपुरावा केला होता.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे मजबुतीकरण करताना अतिक्रमणे काढून जोडरस्ते, चौक मोकळे होणे गरजेचे आहे. रस्ता रुंदीकरण करुन बाजूपट्ट्या व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. प्रस्तावित उन्नत महामार्गाच्या कामाला लागणारा किमान पुढील २-३ वर्षांचा अवधी लक्षात घेता तोपर्यंत टिकेल असे चांगले काम होण्याची अपेक्षा आहे.
- अमित प्रभावळकर, सचिव, तळेगाव-चाकण महामार्ग कृती समिती

तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम यापूर्वीच सुरू केलेले आहे. आठवडाभरात नवीन कामास सुरुवात होणार आहे. या रस्त्यावरील मुख्य गावे, चौक आदींसह आवश्यक ठिकाणी रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण करुन बाजूपट्ट्या भरल्या जाणार आहेत. रस्ता सुरक्षेसाठी चिन्हे निर्देशक, रिफ्लेक्टर बसवून थर्मोप्लॅस्ट पट्टेदेखील मारले जातील.
- राहुल कदम, उपअभियंता, विशेष प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग

PNE26V84758

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निवडणूक की लिलाव? १५ कोटींची ऑफर, तरीही नकार! पैसे वाटपावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

सोलापुरातील धक्कादायक घटना! रिमांड होममधून अल्पवयीन मुलगा, तर घरगुती वादातून सखी वन टॉप सेंटरमध्ये आलेली विवाहिता बेपत्ता; पोलिस घेत आहेत दोघांचा शोध

Mumbai Politics: आरोप, वस्तुस्थिती आणि राजकीय संदर्भ... मुंबई खरंच विकली जातेय का? अदानी समूहावर बोट; पण वास्तव काय सांगतं?

Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर मध्यरात्री दरोडा; नोकरानेच आखला कट!

Cricket Retirement: डिव्हिलियर्सला पहिल्याच सामन्यात बाद करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; १२०+ विकेट्स नावावर

SCROLL FOR NEXT