पिंपरी-चिंचवड

वाहतूक कोंडीच्या वेळी पोलिस ‘भूमिगत’

CD

गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १४ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी आणि वॉर्डन बहुतांश वेळा नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहत नसल्याने वाहतूक नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. वाहतूक विभागाकडील अपुरी कर्मचारी संख्या आणि ढिसाळ नियोजनामुळे मुख्य रस्त्यांवर सर्रास होणारी बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीने तळेगावातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरात ‘वाहतूक पोलिस आहेत की नाहीत’ असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

सद्यःस्थिती
- जिजामाता चौक, मारुती मंदिर चौकासह गाव स्टेशन रस्त्यावर वाहतूक पोलिसांचे अस्तित्व हरवले
- गाव स्टेशन रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे आणि वाहनांच्या पार्किंगमुळे रहदारीस अडथळा
- लिंब फाटा ते मारुती मंदिर चौक रस्त्यावर दुतर्फा वाहनांची पार्किंग
- रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक पोलिस इकडे अभावानेच आढळतात
- यशवंतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती
- छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातगाड्या, भाजीविक्रेते आणि वाहने रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने कोंडी
- शहरभर फटाका बुलेटवरील टवाळखोरांचा उच्छाद
- विना नंबरप्लेट, नंबरप्लेट मॉर्फिंग केलेल्या, काळ्या काचांच्या गाड्या वाहतूक पोलिसांसमोरून बिनदिक्कत जातात
- तळेगाव नगरपरिषदेने दिलेले काही वॉर्डन शहराच्या हद्दीबाहेर नेमलेले दिसतात

समन्वयाचा अभाव
पूर्व पश्चिम दोन्ही टोकाला पोलिस कर्मचारी असूनही प्रवेशबंदी काळातही अवजड वाहने सर्रास तळेगाव-चाकण रस्त्यावरुन ये जा करताना दिसतात. अवजड वाहन प्रवेशबंदी तोडून शहरातून दिवसभर ये जा करणाऱ्या वाहनांच्या मुद्द्यावरून वाहतूक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कुठलाही समन्वय अथवा एकवाक्यता दिसत नाही. एकाने सोडायचे आणि दुसऱ्याने दंड मारायचा यावरून कायम वादविवादाचे प्रसंग पाहायला मिळतात.

सायंकाळी कोंडीत भर
तळेगाव-चाकण रस्त्यावर दुपारी दोन ते चारदरम्यान अवजड वाहतुकीस शिथिलता असल्याने दोन्ही बाजूने अवजड वाहने सोडल्यावर वाहतूक पोलिस गायब असतात. नेमक्या याच वेळी शाळा सुटत असल्याने विद्यार्थ्यांच्या बसही रस्त्यावर येतात. त्यामुळे दुपारी ईगल कंपनीपासून ते इंद्रायणी महाविद्यालयापर्यंत कोंडी पाहायला मिळते. नियमनासाठी पोलिस नसतात. ठराविक वाहतूक पोलिस आणि वॉर्डन वाहतूक नियमन सोडून रेल्वे पुलाशेजारील वाहतूक विभागाच्या चौकीसमोर बाहेरील वाहने अडवून दंड मारण्याचे काम करताना दिसतात.

वाहतुकीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ हवे
रात्री वाहतूक विभागाचा एकच कर्मचारी चौकीत बसून पाहतो. अपुरी कर्मचारी संख्या आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांपैकी बरेच जण बाहेरील बंदोबस्तासाठीचे कारण सांगत पोलिस अधिकारी वेळ मारून नेतात. रहदारीच्या स्टेशन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मराठा क्रांती चौकात तरी कायमस्वरूपी वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिस आणि वॉर्डन दिसावेत ही नागरिकांची मागणी आहे. आयुक्तालयाने वाहतूक विभागास अतिरिक्त मनुष्यबळ वाढवून देण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी व्यापक नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध कर्मचारी संख्येवर वाहतूक कोंडीच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून रहदारीला शिस्त लावण्याची नागरिकांची मागणी आहे.

तळेगाव शहरातील नित्याच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे
- मुंबई-पुणे रस्त्यावरील मॅक डोनाल्ड जंक्शन
- लिंब फाटा ते मारुती मंदिर चौक रस्ता
- जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन चौक रस्ता
- चाकण रस्त्यावरील मराठा क्रांती चौक
- छत्रपती शिवाजी महाराज चौक-यशवंतनगर

वाहतूक विभागाचे मनुष्यबळ
पोलिस अधिकारी : १
पोलिस कर्मचारी : १८ (आवश्यक - ३०)
वाहतूक सहायक (नगरपरिषद) : ७

अपवाद वगळता रहदारी कोंडीच्या ठिकाणी नित्यनियमाने वाहतूक नियमन केले जाते. अपुरी कर्मचारी संख्या आणि बाहेरच्या बंदोबस्तामुळे काही ठिकाणी वाहतूक नियमनात त्रुटी राहतात. अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने पाठपुरावा चालू आहे.
- गणेश लोंढे, सहायक पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग

गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात खरे तर कायमस्वरूपी वाहतूक पोलिस आवश्यक आहेत. रस्त्यावरील हातगाड्या व भाजीविक्रेते यांच्यावर नगरपरिषदेमार्फत सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, वारंवार तक्रार करूनही नगरपरिषद प्रशासन आणि वाहतूक पोलिस उदासीन असल्याने इथे रोजच वाहतूक कोंडी होते.
- किशोर गायकवाड, रहिवासी, यशवंतनगर

लिंबफाटा ते मारुती मंदिर चौक रस्ता कायम बेशिस्त पार्किंगने भरलेला असतो. इकडे वाहतूक पोलिस काहीच कारवाई करत नाहीत. बुलेटस्वारांचे फटाके, काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट, बिना नंबरप्लेट, चार-पाच सीट दुचाकीस्वार यांच्याकडे पोलिस कानाडोळा करतात. फुटपाथ नाहीसे झाल्याने पार्किंगने व्यापलेल्या रस्त्यावरून नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.
- संदीप गडसिंग, रहिवासी, तळेगाव दाभाडे

तळेगाव स्टेशन : वाहतूक पोलिस जागेवर नसल्याने चाकण रस्त्यावरील मराठा क्रांती चौकात शनिवारी दुपारी झालेली वाहतूक कोंडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT