पिंपरी-चिंचवड

बनेश्वर मंदिरात घुमले मंगलाष्टकांचे सूर!

CD

तळेगाव स्टेशन, ता. १६ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त रविवारी उत्तररात्री तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्री बनेश्वर महादेव मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाहसोहळा पारंपरिक थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. रात्री १२.२४ वाजताच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो शिवभक्तांनी मंदिरात गर्दी केली होती.
तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्री बनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (ता. १५) पहाटे दाभाडे घराण्याच्या वंशजांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. शिवभक्तांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. रात्री आठच्या महाआरतीनंतर एकतारी भजन झाले. महाशिवरात्री उत्सवाचे खरे आकर्षण ठरला तो रात्री पार पडलेला शिव-पार्वती विवाहसोहळा. उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या धर्तीवर बनेश्वर मंदिरात गतवर्षीपासून सुरू झालेल्या परंपरेनुसार, रात्री सव्वाबारा वाजता वधू रूपातील माता पार्वतीचे मंदिरात आगमन झाले. कपाळावर मुंडावळ्या, कुंकवाचा मळवट, अंगावर सुवर्ण वस्त्रालंकार आणि पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या पार्वतीचे गाभाऱ्यात आगमन होताच मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. वधू पार्वती मंदिरातील गाभाऱ्यात बोहल्यावर विराजमान झाल्यानंतर उपस्थित भाविकांना अक्षदा आणि फुले वाटण्यात आली. वधू-वरांमध्ये अंतरपाट धरून मंगलमय सुरात मंगलाष्टके म्हणत सनई-चौघड्यांच्या निनादात आणि मंत्रोच्चारांच्या गजरात पार्वती आणि भगवान शंकर शास्त्रोक्त पद्धतीने विवाहबद्ध झाले. अतुल रेडे यांनी विवाह सोहळ्याचे पौराहित्य केले. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर देवाची महाआरती करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
दाभाडे घराण्यातील वृषालीराजे दाभाडे आणि सत्यशीलराजे दाभाडे यांची विशेष उपस्थिती ​या सोहळ्याला लाभली. तसेच नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, नगरसेवक विनोद भेगडे, राजेश सरोदे, ब्रिजेंद्र किल्लावाला, अरविंद गद्रे आदी या सोहळ्याचे साक्षीदार झाले. दरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळा यशस्वितेसाठी बनेश्वर सेवा मित्र मंडळ आणि संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सोमवारी (ता. १६) दुपारी १२ वाजता महाप्रसाद वाटपाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT