तळेगाव स्टेशन, ता.२१ : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतिलाल शाह विद्यालयात शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी ‘कालांतर मेळा पार पडला.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक हस्तकला वस्तू, गृहोपयोगी वस्तू, कलाकृतींसह विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीचे स्टॉल विद्यालयाच्या आवारात उभारण्यात आले होते. संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या हस्ते मेळ्याचे उद्घाटन झाले. उपाध्यक्ष शैलेश शाह, डॉ. संभाजी मलघे, संदीप भोसले, गोरख काकडे आदी उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. मेळ्यात विक्रीसाठी मांडलेल्या वस्तूंच्या निर्मितीपासून स्टॉलचे नियोजन, मांडणी, विक्री आणि हिशोब सर्व बाबी विद्यार्थ्यांनी सांभाळल्या. उपस्थितांनी स्टॉलला भेटी देत विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत भविष्यासाठी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका वैशाली शिंदे, व्यवस्थापिका अर्चना चव्हाण, सारिका तितर, शिल्पा पाचलग, उषा टोणपी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.