पिंपरी-चिंचवड

वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे बुलेटराजांचा ‘फटाका फुस्स’!

CD

तळेगाव स्टेशन, ता. २७ : सायलेंसरमधून फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज काढत गल्लीबोळांतून चकरा मारून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या टवाळखोर बुलेटस्वारांसह नियमभंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाने कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत ३४ बुलेटचे मॉडिफाइड सायलेंसर्स काढून घेत वाहतूक पोलिसांनी त्यांचे ‘फटाके’ फुसके केले आहेत.
तळेगाव दाभाडे शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरासह गल्लीबोळांत मॉडिफाइड सायलेंसर लावलेल्या बुलेट, नंबरप्लेटमध्ये छेडछाड केलेल्या दुचाकी तसेच काळ्या काचा व नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी वाहनांचा उच्छाद वाढला होता. यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत असून, नागरिकांच्या शांततेलाही बाधा पोहोचत होती.
‘सकाळ’ने यासंदर्भात वारंवार प्रकाश टाकून बेशिस्त वाहनचालकांकडे वाहतूक विभागाचे लक्ष वेधले आहे. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे प्रभारी तथा साहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश लोंढे यांनी आठवडाभरापासून शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर तपासणी मोहिमेद्वारे धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवार (ता. २४) पासून शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी (ता. २६) सायंकाळी यशवंतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलेल्या कारवाईत अनेक बुलेटचे मॉडिफाइड सायलेंसर मेकॅनिकच्या मदतीने काढून जप्त करण्यात आले. काही काळ्या काचांच्या वाहनांवरील फिल्मही काढण्यात आली. ट्रिपल सीट, फॅन्सी अथवा विना नंबरप्लेट वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (ता. २७) सकाळी चाकण रस्त्यावरील इंद्रायणी महाविद्यालय परिसर तसेच नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरही तपासणी करत ‘फटाका बुलेट’वर कारवाई करण्यात आली. यापुढे सध्या वेशात गस्त घालून गल्लीबोळांत उच्छाद मांडणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा लोंढे यांनी दिला आहे. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास टाकला आहे. नियमबाह्य मॉडिफाइड सायलेंसर बसवून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही पोलिसांकडून कारवाईची नागरिकांना अपेक्षा आहे.

तळेगाव वाहतूक विभागाची कारवाई (२४ ते २७ फेब्रुवारीपर्यंत)
एकूण बुलेटवर दंडात्मक कारवाई : ५६
जप्त मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर : ३४
काळ्या काचांची वाहने : ६९
फॅन्सी/विना नंबरप्लेट : १६२

‘‘वाहनचालकांनी स्वतःसह सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या टवाळखोर फटाका बुलेटस्वारांची यापुढे गय केली जाणार नाही. सात्यत्याने कारवाई चालू ठेवणार आहोत. नागरिकांच्या सूचना आणि सहकार्याची अपेक्षा आहे.
- गणेश लोंढे, साहाय्यक पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

SCROLL FOR NEXT