पिंपरी-चिंचवड

त्रस्त एलपीजी ग्राहकांचा तळेगावात रास्ता रोको

CD

तळेगाव स्टेशन, ता.१८ : सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या घरगुती एलपीजी ग्राहकांनी मंगळवार (ता.१७) आणि बुधवारी (ता.१८) असे सलग दोन दिवस दुपारी तळेगाव स्टेशन परिसरातील वीरजी खिमजी गॅस एजन्सीसमोर तळेगाव-चाकण रस्त्यावर मोकळे सिलिंडर आडवे ठेवत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. तळेगाव पोलिस आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत समजूत काढल्याने ग्राहक घरी परतले.
गेल्या आठवडाभरापासून आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्‍भवलेल्या गॅस टंचाईमुळे घरपोच डिलीव्हरी बंद असल्याने तळेगावातील ग्राहक घरगुती गॅस सिलिंडरसाठी एजन्सीसमोर सकाळपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस या रांगेत वाढ होत असल्याचे दिसते. मात्र, मंगळवारी सकाळपासून रांगेत उभ्या बहुतांश ग्राहकांना सिलिंडर न मिळाल्याने त्यांनी तळेगाव-चाकण रस्त्यावर मोकळे गॅस सिलिंडर आडवे लावून रहदारी रोखण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांनी अचानक घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे चाकणकडून वडगावकडे जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास विस्कळीत झाली. तसेच वाहतूक कोंडी झाली. तळेगाव दाभाडे पोलिस आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची समजूत काढत रहदारी सुरळीत केली. त्यानंतर मावळ पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक संदीप तनपुरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी तुषार तनपुरे यांनी वीरजी खिमजी गॅस एजन्सीला भेट देऊन रांगेत उभ्या ग्राहकांना समजावण्याचा प्रयत्न केला. शंकांचे काही अंशी निरसन केल्याने त्रस्त ग्राहक मोकळ्या सिलिंडरसह घरी परतले.


एजन्सी, गोदामांना भेटी
घरगुती सिलिंडरचे वितरण केवळ ओटीपी प्रणालीद्वारे गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत अर्थात ४ दिवसांत करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गॅस वितरकांना सोमवारी (ता.१६) दिले. त्याअनुषंगाने प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक संदीप तनपुरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी तुषार तनपुरे यांनी एकूण ११ गॅस वितरक एजन्सीला भेट देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे सक्तीने पालन करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच त्यांच्या गोदामांना प्रत्यक्ष भेट देऊन जाऊन सिलिंडरच्या साठ्याची तपासणी केली. घरपोच सिलिंडर डिलिव्हरीबाबत सूचना देणारे फलक गॅस एजन्सीसमोर लावण्यात आल्याने कुणी एजन्सीसमोर रांगा लावू नयेत, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT