पिंपरी-चिंचवड

कचरा जाळणाऱ्या दुकानदारास तळेगाव नगरपरिषदेकडून दंड

CD

तळेगाव स्टेशन, ता. २५ : सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर प्लॅस्टिक कचरा जाळून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या एका दुकानदारास तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने दोन हजार रुपये दंड करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. बुधवारी (ता. २५) सकाळी जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयासमोरील मातोश्री स्टील ॲण्ड फर्निचर या दुकानासमोर रस्त्यावरील पदपथालगत असलेल्या अशोकाच्या झाडाच्या बुंध्यापाशी प्लॅस्टिक कचरा जळताना आढळून आला. ही बाब नगरपरिषद प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर स्टेशन विभागाचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय ढवळे, मुकादम राहुल आगळे, साजिद शेख, शुभम हेंद्रे आणि आदेश जाधव यांनी संबंधित ठिकाणी जाऊन चौकशीअंती दोषी ठरलेल्या दुकानदारास दोन हजार रुपयांचा दंड ठोठावून प्रतिबंधात्मक कारवाई केली. यापुढे कचरा न जाळण्याबाबत दुकानदारास सक्त ताकीद दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत उघड्यावर कचरा फेकणारे, कचरा जाळणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT