पिंपरी-चिंचवड

मावळात जमिनीच्या वादातून चुलत्याचा खून

CD

तळेगाव स्टेशन, ता. २८ : जमिनीच्या वादातून कोयत्याने वार करत पुतण्याने चुलत्याचा खून केला. ही घटना जाधववाडी शिवारात जांभळीच्या रानावर सोमवारी मध्यरात्री (ता.२७) घडली. या प्रकरणात पुतण्या आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रवींद्र उर्फ रवी जाधव (वय ४४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, विशाल सुखदेव जाधव (वय २१) याला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी खेड येथून अटक केली. तर, दुसरा आरोपी ओंकार सोळसे (वय २२, तिन्हेवाडी रस्ता, खेड-राजगुरूनगर) याला गुन्हे शाखा युनिट ४च्या पथकाने पेठ पारगाव येथून अटक केली.
जमिनीची वाटणी आणि पीएमआरडीए पाइपलाइनचे मिळणारे पैसे या कारणांवरून विशाल आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचे तपासात समोर आले, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. सोमवारी (ता.२७) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT