पिंपरी-चिंचवड

मावळातील विद्यार्थ्यांना कॅपतर्फे २० हजार वह्यांचे वाटप

CD

तळेगाव स्टेशन, ता. २६ : पुणे जिल्हा परिषदेच्या मावळ तालुक्याच्या दुर्गम भागातील १६८ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसह आदिवासी आश्रम शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तळेगाव दाभाडे येथील सामाजिक सहयोग उपक्रम संस्थेतर्फे दानशूरांकडून जमा करण्यात आलेल्या तब्बल २० हजार वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
समाजातील आर्थिक दुर्बलांच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या कॅप संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून मावळच्या दुर्गम भागातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थेकडून वही वाटप करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे प्राथमिक शाळा सुरू झाल्यानंतर कॅपचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक १८ जूनला सकाळी शाळांमध्ये गेले. परिसरातील दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यातून या वह्यांची खरेदी करून गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे मोफत वाटप करण्यात आले. संस्थापिका नयना आभाळे आणि अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी वह्यांचे नियोजनबद्ध वाटप केले. नव्या कोऱ्या वह्या हातात पडल्यानंतर साहजिकच या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाखाणण्याजोगा होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद, समाधान आणि शिक्षणाविषयीची उमेद पाहून या उपक्रमाचे सार्थक झाल्याची भावना सदस्यांमध्ये निर्माण झाली. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांनी कॅप संस्थेचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

इंगळूण : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना कँपचे सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT