पिंपरी-चिंचवड

चाकणच्या समस्यांचे ग्रहण सुटणार

CD

तळेगाव स्टेशन, ता. २६ : चाकण औद्योगिक क्षेत्राला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचे ग्रहण अखेर सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. पायाभूत सुविधा आणि अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती, प्रत्यक्ष भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आढावा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यात घेतलेली बैठक तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यंत्रणांची मोट बांधून कृती आराखड्याद्वारे सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे उद्योजकांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले आहेत.
वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेत सुधारणा करून अखंडित वीज आणि पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, परिसर अधिक राहण्यायोग्य व उद्योगस्नेही बनविण्याच्या हेतूने लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) काही उद्योजकांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. तातडीच्या, मध्यमकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची व्यापक नियोजनासह अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे उद्योजकांमध्ये विश्वास निर्माण झाला. गेल्या दोन आठवड्यांत प्रत्यक्षात कृती दिसू लागल्या आहेत. चाकणमधील पायाभूत आणि मूलभूत सुविधांच्या समस्यांबाबतची चळवळ कधीही शासनाच्या विरोधात नव्हती. शासन, उद्योग, स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या एकत्रित सहभागातून चाकणच्या उज्ज्वल भविष्यासाठीची ही चळवळ भविष्यातही सुरू ठेवण्याची उद्योजकांची भूमिका आहे.
कृती आराखड्यानुसार ठरविलेली कामे वेळेत पूर्ण होणे आणि त्याचे सकारात्मक, शाश्वत परिणाम प्रत्यक्ष चाकणच्या रस्त्यांवर, उद्योगांमध्ये आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसणे यावरच यश मोजले जावे अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. त्यामुळे संघर्षापेक्षा सकारात्मक सहकार्याद्वारे उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शक पद्धतीने प्रगतीचा नियमित आढावा, हीच पुढील वाटचाल राहणार असल्याचे उद्योजकांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
---

मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना झाल्या नाही तर स्थलांतर अथवा भविष्यातील विस्तार अन्यत्र करण्याचा गंभीरपणे विचार करण्याची भूमिका २० लघु-मध्यम कंपन्यांनी मांडली होती. गुंतवणुकीसाठी चाकण किंवा महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचा उद्देश नव्हता आणि आजही नाही. उलट देशातील अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक उत्पादन केंद्रांपैकी एक असलेल्या चाकणचे भविष्य अधिक सक्षम आणि शाश्वत करणे, हाच उद्देश होता. उद्योजकांच्या मागण्यांची महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च स्तरावर गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल निश्चितच समाधान आहे. चाकणची जनता आणि उद्योगांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात दैनिक ‘सकाळ’सह इतर माध्यमांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- धनंजय शेडबाळे, उद्योजक

चाकण परिसर वाहतूक कोंडीमुक्त, स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक, राहण्यायोग्य तसेच उद्योगस्नेही आणि गुंतवणूकस्नेही बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, वाहतूक विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांना आम्ही पूर्णपणे सकारात्मक सहकार्य करत राहू. उद्योगांनी चाकण सोडावे, अशी आमची इच्छा नाही. उलट कोणत्याही उद्योगाला चाकण सोडण्याचा विचारही करावा लागू नये आणि नवीन उद्योग व जागतिक गुंतवणूकदारांनी चाकणमध्ये विश्वासाने यावे असे वातावरण आम्हाला प्रशासनाच्या मदतीने घडवायचे आहे. शासनाने आमचा संदेश गांभीर्याने घेत प्रत्यक्ष उपाययोजनांना सुरुवात केली आहे. या सकारात्मक प्रतिसादाचे आम्ही मनापासून स्वागत आणि प्रशंसा करतो.
- शंतनु कुलकर्णी, उद्योजक
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT