पिंपरी-चिंचवड

आंद्रा धरणातून पिंपरी चिंचवडला पाणी नको

CD

तळेगाव स्टेशन, ता. ८ : ‘‘आंद्रा धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या सोडवा. भविष्यातील संभाव्य स्थानिक पाणीटंचाईचा मुद्दा लक्षात घ्या,’’ असे मुद्दे मांडत आंद्रा धरणातील पाणी पिंपरी चिंचवड शहराला बंदिस्त वाहिनीद्वारे देण्यास आंदर मावळातील गावकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

याबाबत या ग्रामस्थांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना गुरुवारी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
आंद्रा धरणासाठी १९९९ मध्ये आंदर मावळातील टाकवे, वेलज, फळणे, राजपुरी, कोंडीवडे, कशाळ, भोयरे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आवळे, कदमवाडी, घोलपवाडी, शिंदे, शेटेवाडी, मंगळूर आदी गावांतील संपादित जमिनींचा शासनाने अत्यल्प मोबदला दिला. त्याचा वाढीव मोबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. धरणग्रस्तांना जमीन वाटपासाठी शासनाने मावळ व हवेली तालुक्यामध्ये संपादित केलेल्या जमिनीचे वाटप न करता जमिनीवरील शिक्का काढला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तळेगाव एमआयडीसी टप्पा क्र. चारसाठी निगडे, आंबळे, पवळेवाडी व कल्हाट या चार गावांत भूसंपादन करण्यात येत आहे,’’ असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
‘‘बाधित गावांचा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा प्रश्न केंद्र शासनाकडे सन २०१७ पासून प्रलंबित आहे. धरण होऊन शासनाला ग्रामस्थांचे प्रश्न सोडवता आलेले नाहीत. प्रकल्पबाधित गावांचे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजनदेखील आंद्रा धरणातूनच आहे. या पार्श्वभूमीवर ​शासनाने आता आंद्र धरणातून १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पिंपरी चिंचवड शहरास ग्रामस्थांना विश्वासात न घेता देण्याचा घाट घातला आहे,’’ त्याला वरील सर्व गावातील ग्रामस्थ, शेतकरी, भूमिपुत्रांचा विरोध आहे,’’ असा आरोप करण्यात आला आहे.

शासनाने बैठक बोलवावी
निगडी बंधाऱ्यातून आजही १०० एमएलडी पाणी उचलले जात आहे. त्यास विरोध नाही. परंतु बंद जलवाहिनीमधून आंद्र धरणातून पाणी नेण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या शासनाने बैठक बोलावून प्राधान्याने सोडवाव्यात, अशी ग्रामस्थांची मूळ मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

Yashasvi Jaiswal आता होणार विकेटकिपर? नवा प्लॅन चर्चेत; कर्णधारानेही केलाय खुलासा

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT