वडगाव मावळ, ता. १६ : जमिनीचे कुलमुखत्यार पत्र रद्द केलेले असतानाही ते रद्द केले नसल्याचे घोषणा पत्रात नमूद करून त्या आधारे खरेदी दस्त नोंदवून मूळ मालकाची व सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी एक जणावर गुन्हा दाखल केला.
चेतन खेराजमल अगीचा (तक्षशिला को. ऑप. सोसायटी, मोरवाडी, पिंपरी) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. वडगाव मावळचे दुय्यम निबंधक संतोष जनार्दन कडाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. आठ एप्रिल २००८ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हा प्रकार घडला होता. बुधवारी (ता. १५) हा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरी येथील एका मिळकतीचे मूळ मालकाने आरोपीला दिलेले कुलमुखत्यार दस्त रद्द केले असताना सुद्धा खरेदी दस्त नोंदविताना घोषणापत्रामध्ये कुलमुखत्यारपत्र रद्द केले नसल्याचे खोटे नमूद करून शासनाची व मिळकतीच्या मुळ मालकाची फसवणूक केली. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने वडगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ए. एम. तावरे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.