पिंपरी-चिंचवड

वडगाव नगरपंचायत विशेष सभेत समस्या निकाली

CD

वडगाव मावळ, ता. ३० : पाणी पुरवठा योजनांची सुधारणा, शहरातील सार्वजनिक विहिरी व तलावांची सुधारणा व सुशोभीकरण, चोऱ्या व गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी ३७ विषयांना वडगाव नगरपंचायतीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. वडगाव नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, गटनेते राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना, दिनेश ढोरे आदींसह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

सभेत माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत शहरातील सार्वजनिक विहिरी व तलावांचे पुनर्जीवन करून त्यांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी देशी वृक्षांची लागवड करणे. घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण प्रकल्प आराखडा तयार करून राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे मान्यतेसाठी पाठविणे. आठवडे बाजारासाठी जागेची पाहणी करून नवीन करार करणे. विधि विषयक सल्ल्यांसाठी सल्लागार मंडळावर विधी सल्लागाराची नेमणूक करणे. प्रभाग ७ व प्रभाग १४ मधील उपलब्ध ओपन स्पेस मोजणी करून त्याठिकाणी पाण्याची टाकी उभारणे. नगरपंचायत मालकीच्या उपलब्ध जागेमध्ये मल्टीपर्पज हॉल बांधणे. नगरपंचायत हद्दीतील अंगणवाड्यांसाठी माझी वसुंधरा अंतर्गत ई टॉयलेट बांधणे. स्ट्रीट लाईटची अपूर्ण कामे पूर्ण करणे. प्रभाग चार मधील अनधिकृत दारू विक्री अड्ड्यावर एमआरटी प्रमाणे कारवाई करून तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंध- अपंग लाभार्थ्यांना तीन टक्के कल्याण निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. त्याच प्रमाणे ज्या ग्रामपंचायत कालीन कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीमध्ये अद्याप समावेश झालेले नाही परंतु ते निवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना सेवा उपदान ( ग्रॅज्युईटी ) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आला. शहरात काही मंजूर झालेली परंतु मालकी हक्काचा वाद व काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली कामे रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT