पिंपरी-चिंचवड

‘खेळ रंगला पैठणी’मध्ये दीड हजार महिला

CD

वडगाव मावळ, ता. ३१ : आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून येथील मोरया महिला प्रतिष्ठान, जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळाने आयोजित केलेल्या ‘खेळ रंगला पैठणी’चा होम मिनिस्टर २०२३ या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या खेळात सुमारे दीड हजार महिलांनी सहभाग घेतला.
वडगाव नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका पूनम खंडेराव जाधव, पूजा विशाल वहिले व माया अमर चव्हाण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नितीन कोकणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी नगरसेविका संगीता शेळके, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, विशाल वहिले, मंगेश खैरे, पूनम जाधव, पूजा वहिले, माया चव्हाण, वैशाली ढोरे, पूनम वायकर, सायली म्हाळसकर, चेतना ढोरे, नूतन ढोरे, कविता नखाते, प्रतीक्षा गट, प्रियांका खैरे, सुषमा जाजू, तुषार वहिले, सौरभ सावले, हेमंत जाधव, अभिजित ढोरे, आफताब सय्यद आदी उपस्थित होते.
या खेळात सीमा सचिन जाधव यांनी प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी पटकावली. राजश्री दीपक जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची नथ तर श्रद्धा प्रवीण मांडवकर यांनी तिसऱ्या क्रमांकाचा चांदीचा छल्ला पटकावला. याशिवाय तीन उत्तेजनार्थ विजेत्यांना चांदीची नाणी तसेच उपस्थित असलेल्या सर्व महिलाभगिनींना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. उत्तर प्रदेश सहारणपूर येथे पार पडलेल्या १३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कुराश (रशियन) कुस्ती मध्ये पैलवान कृष्णाई प्रशांत वाडकर हिने बाँझपदक पटकाविल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रेक्षक महिलांसाठी लकी ड्रॉ देखील घेण्यात आला होता. त्यात विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT