पिंपरी-चिंचवड

बेपत्ता अल्पवयीन भावंडे सापडली

CD

वडगाव मावळ, ता.३ : तीन दिवसांपासून बेपत्ता झालेली येथील माळीनगर भागातील तीन अल्पवयीन बहिण-भावंडे शुक्रवारी दुपारी वेहरगाव येथील एकवीरा देवी मंदिर परिसरात आढळून आली. पोलिसांनी त्यांना त्यांच्या आईच्या स्वाधीन केले आहे.
प्रेम शरद हिवराळे (वय १३ वर्षे), भाग्यश्री शरद हिवराळे (वय ११ वर्षे) व प्रेरणा शरद हिवराळे (वय ९ वर्षे, तिघेही रा. माळीनगर, वडगाव मावळ) अशी या मुलांची नावे आहेत. वडगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.३१) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही तीनही मुले त्यांच्या राहत्या झोपडी समोरून बेपत्ता झाली होती. त्यांची आई स्वाती विजय रसाळ (वय ३०) यांनी गुरुवारी दुपारी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही मुले नेहमी घर सोडून जात असल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT