वडगाव मावळ, ता. २८ : मावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपीक व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा किसान युनियनने केली आहे.
युनियनचे संस्थापक अध्यक्ष माउली दाभाडे, माजी सभापती गणपतराव शेडगे, दत्तात्रेय आंद्रे, बाळासाहेब मोहोळ, लक्ष्मण शिरसट, रवींद्र ठाकर आदींनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शनिवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे शेतातील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोमॅटो व इतर पालेभाज्यांचे देखील नुकसान झाले आहे. सर्व मंडल विभागातून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.