पिंपरी-चिंचवड

वडगावात करवसुलीसाठी कारवाईचा बडगा आतापर्यंत चाळीस टक्के वसुली ः पथकाद्वारे घरोघरी जाऊन आवाहन

CD

वडगाव मावळ, ता. २९ ः वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी मिळकत कर तसेच पाणीपट्टी कराची मागील थकबाकी तसेच चालू कराचा भरणा त्वरित करावा व दंडात्मक व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
वडगाव नगरपंचायतीची मिळकत कराची वार्षिक मागणी सुमारे अडीच कोटी रुपये असून, मागील थकबाकी सुमारे तीन कोटी रुपये आहे. आतापर्यंत त्यातील जेमतेम १ कोटी ८ लाख रुपयांची (४० टक्के) वसुली झाली आहे. पाणीपट्टीची वार्षिक मागणी ६६ लाख रुपये असून, मागील थकबाकी सुमारे दीड कोटी रुपये आहे. त्यातील जेमतेम १९ लाख रुपयांची (३० टक्के) वसुली झाली आहे. काही नागरिकांनी ग्रामपंचायत काळापासून तर काहींनी कोरोना काळापासून कराचा भरणा केलेला नाही. त्यांच्याकडे सुमारे दीड लाख रुपयांपासून आठ लाख रुपयांची थकबाकी आहे. अनेक सदनिकाधारक की ज्यांनी गुंतवणूक म्हणून सदनिका घेऊन भाड्याने दिल्या आहेत, त्यांचा यात समावेश आहे. तसेच शहरात सुमारे ४० चाळी असून, त्या भाड्याने दिल्या आहेत. कर भरण्याबाबत भाडेकरू व घरमालक एकमेकांकडे अंगुली निर्देश करत आहेत. कराचा भरणा करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अनेक सदनिकाधारक व चाळी मालकांनी अनधिकृतपणे नळजोड मात्र घेतलेले आहेत. अशा मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. कराची वसुली करण्यासाठी तीन विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली तीन वसुली पथके तयार केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन, नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करत आहेत. नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांना घर बसल्या कर भरणा करता यावा, यासाठी सोप्या पद्धतीने ऑनलाइन कर भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच www.vadgaonmc.org या वेबसाइटवर जाऊनसुद्धा वॉर्ड नंबर व मालमत्ता क्रमांक टाकून गुगल पे, फोन-पे, युपीआय पेमेंट तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डनेसुद्धा कर भरणा करू शकतात.
शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कर भरण्यासाठी अथवा अडचणी सोडविण्यासाठी कार्यालय चालू राहणार आहे. फोनद्वारेही नागरिकांच्या तक्रारी सोडविल्या जातील. येत्या १५ एप्रिलपर्यंत सुमारे ८० ते ८५ टक्के कर वसुली करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी दिली.

थकबाकी न भरल्यास नळजोड तोडणार
अनधिकृत नळजोड व ५० टक्क्यांपेक्षा अधिक सदनिकाधारकांच्या कराची थकबाकी आहे. अशा सदनिकांचे नळजोड तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या इतर सुविधाही बंद करण्यात येणार आहेत. अनधिकृत नळजोड वापरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल. ५० मोठ्या थकबाकीदारांची (टॉप डिफॉल्टर ) यादी करण्यात आली असून, सुरवातीला त्यांचे नळजोड तोडण्यात येतील. त्यांची मालमत्ता जप्त करून, त्यांना वॉरंट पाठविले जाईल व त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करून, करांची थकबाकी वसूल केली जाईल. थकबाकीदारांवर शास्तीकर लावण्याची तरतूद असून, तो लावला जाईल.

‘‘शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शहरात वीज, पाणी, रस्ते, पथदिवे आदी सोयी सुविधा पुरविण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे. नगरपंचायतीला कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नाही परंतु कर वसुलीसाठी नाइलाजाने कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. नागरिकांनी त्वरित कराचा भरणा करून तो टाळावा.
- डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगाव नगरपंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT