पिंपरी-चिंचवड

वडगाव येथे उद्या सामुदायिक विवाह सोहळा

CD

वडगाव मावळ, ता. २९ : येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (ता. १) सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यात अकरा जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.
प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा उपक्रमाचे हे ११वे वर्ष असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष रोहिदास गराडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब तुमकर, कार्यक्रम प्रमुख अरुण वाघमारे यांनी या वर्षीच्या सोहळ्याची माहिती दिली.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात हा विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते १ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी नितीन महाराज काकडे, मंगल महाराज जगताप, तुषार महाराज दळवी, दत्तात्रेय महाराज टेमघरे, सुदाम महाराज सानप, बाळासाहेब काशीद, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, संजोग वाघेरे, बापूसाहेब भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारपयोगी भांडी, वधूला चांदीचे अलंकार, मनगटी घड्याळ देण्यात येणार असून, लकी ड्रॉ ही ठेवण्यात आला आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून सर्व जोडप्यांना आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी नंदकुमार ढोरे, योगेश वाघवले, संभाजी येळवंडे, अभिजित ढोरे, अनिल कोद्रे, संतोष निघोजकर आदींसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी संयोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT