पिंपरी-चिंचवड

तिकोना किल्ल्यावर सुधारणांची कामे सुरू

CD

वडगाव मावळ, ता. १ : मावळ तालुक्यातील तिकोना (वितंडगड) किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सुमारे एक कोटी ४७ लाख रुपये खर्चाची सुधारणांची विविध कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे गडाचे संवर्धन होऊन त्याला गतवैभव प्राप्त होणार आहे.
वडगाव येथील गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून गड संवर्धनाची छोटी-मोठी कामे सुरू होती व मोठ्या कामांसाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. तिकोनागड हा राज्याच्या असंरक्षित स्मारकामध्ये येत असल्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने तिकोना गडाच्या संवर्धनासाठी मोहीम सुरू केली व सुमारे एक लाख रुपये खर्च करून वास्तुविशारदांकडून गडाचा विकास आराखडा तयार करून घेतला. या आराखड्यावरून गडावर विविध कामे करण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक विलास वाहने यांनी दोन कोटी ११ लाख ४९ हजार रुपये निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार शासनाने गडाच्या संवर्धनासाठी हा निधी मंजूर केला.
सध्या किल्ल्यावरील देवडी परिसर व वेताळ दरवाजा परिसरात पायऱ्या, तटबंदी, बुरूज, सुरक्षा रेलिंग आदी कामे केली जात आहेत. मंजूर निधीतून मोठी कामे होणार असून, लहान कामे गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी गणेश जाधव यांनी दिली.

पर्यटकांना १५ जूनपर्यंत गडावर येण्यास मज्जाव
तिकोना गडावर पुरातत्त्व विभागाच्या वतीने पायरी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पर्यटकांना येत्या १५ जूनपर्यंत गडावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गडावर जाण्यासाठी एकच पायरी मार्ग आहे. पर्यटकांच्या येण्या-जाण्याने नव्याने बसविण्यात येत असलेल्या पायऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न असल्याने पर्यटकांना गडावर येण्यास प्रतिबंध केला आहे. दुर्गप्रेमी व पर्यटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT