पिंपरी-चिंचवड

विसापूर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम, पर्यटकांचे प्रबोधन

CD

वडगाव मावळ, ता.१० : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्यावतीने मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिराचा जीर्णोद्धार दिन रविवारी (ता.९) स्वच्छता मोहीम, पर्यटकांचे प्रबोधन अशा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पावसाळ्यात विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिर हे २०१६ मध्ये पूर्णपणे ढासळले होते. मंचाच्या पाठपुराव्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत २०१७ मध्ये शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंचाच्यावतीने दरवर्षी हा दिन साजरा केला जातो.
सकाळी शंभू महादेवाला लघु रुद्राभिषेक करण्यात आला. त्यामुळे, गडावरील वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. यावेळी उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर, सर्व कार्यकर्त्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबविली. प्लास्टिकच्या बाटल्या, कागद आदी कचरा गोळा करण्यात आला. विसापूर किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांचे स्वच्छतेविषयी प्रबोधन देखील करण्यात आले. मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, संदीप गाडे, मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, सागर दळवी, बसप्पा भंडारी, चेतन जोशी आदींनी संयोजन केले.

लोहगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी हवी
लोहगड विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य करत आहे. लोहगड ग्रामस्थांच्या सहकार्यातून लोहगडवरील शिवमंदिर जीर्णोद्धार व पायथ्याला भव्य शिवस्मारक उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारद्वारे लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनासाठी नुकताच प्रस्ताव दिला आहे, ही बाब मावळवासियांसाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे, गडसंवर्धनाची उर्वरित कामे जसे लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी, विसापूर किल्ल्यावरील संवर्धनाची कामे ताबडतोब सुरू करण्यात यावी, अशी मागणी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, लोकल २० मिनिटे उशिरा

UP Police: एक लाख पोलिसांची मेगाभरती! CM योगींची मोठी घोषणा; एकाच वर्षात लाखो तरुणांना मिळणार खाकी वर्दीची संधी!

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT