पिंपरी-चिंचवड

मावळात खतांचा तुटवडा; पुरवठा सुरळीत ठेवा

CD

वडगाव मावळ, ता.१ : मावळ तालुक्यात खतांचा तुटवडा जाणवत असून खते न मिळाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. भात पिकासाठी खताची गरज असल्याने तालुक्यातील खत पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर, कार्याध्यक्ष सचिन मुऱ्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम कलावडे, ग्रामीण ब्लॉक कार्याध्यक्ष सोमनाथ वाघोले, भानुदास जांभुळकर, चेतन थोरवे, स्वप्निल मोढवे, अमोल काकरे, प्रशांत ओव्हाळ आदी पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन वरील निवेदन दिले. मावळ तालुका हा कृषी, पर्यटन, औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचा तालुका मानला जातो. मावळ तालुक्यात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून गुलाब फुले, फळ भाज्या यांचे क्षेत्रही मोठे आहे. या सर्व पिकांसाठी शेतकऱ्यांना खताची मोठ्या प्रमाणात गरज लागते. विशेष करून कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या खते वितरकांकडून युरिया, महाधन व इतर खते उपलब्ध होणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामामध्ये संपूर्ण तालुक्यात भात लावणीच्यावेळी आवश्यक असलेली खतांची मागणी लक्षात घेता त्यामध्ये तुटवडा जाणवत आहे. खते न मिळाल्याने शेतकरी चिंतेत असून काही ठिकाणी त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान न होता खतांचा पुरवठा सुरळीत करावा, असे त्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT