वडगाव मावळ, ता. २ : मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पावसाचे आगमन झाले असून, आकाशाला डोळे लावून बसलेला बळिराजा सुखावला आहे.
मावळ तालुक्यात मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. तालुक्यात भाताची शंभर टक्के पेरणी झाली आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या पवन व नाणे मावळातील अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच भाताची पेरणी केली होती. रोपांची उगवण झाली मात्र; कडक उन्हामुळे रोपे पिवळी पडू लागली होती. तर धूळ वाफेवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी आकाशाकडे डोळे लावले होते.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मॉन्सूनचे आगमन झाले. सोमवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. वडगाव येथे २१ मिलिमीटर, तळेगाव दाभाडे येथे १८ मिलिमीटर, लोणावळा येथे १३६ मिलिमीटर, शिवणे येथे २२ मिलिमीटर, खडकाळा येथे २६ मिलिमीटर, काले कॉलनी येथे ४४ मिलिमीटर, कार्ला येथे ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारीही दिवसभर सरीवर सरी सुरू होत्या. खरीप पिकांना गरजेच्यावेळी पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. भाताबरोबरच भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये या खरीप पिकांसाठीही हा पाऊस लाभदायक आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भाताची लवकर पेरणी झालेल्या भागात येत्या आठवडाभरात भात लागवडीची कामे जोरात सुरू होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.