पिंपरी-चिंचवड

माझी लाडकी बहिण योजनेद्‍वारे राज्यातील महिलांचा सन्मान

CD

वडगाव मावळ, ता. ९ ः महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्‍वारे राज्यातील महिलांचा सन्मान केला आहे. गोर-गरीब महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत आहे की, आता पर्यंतची सर्वात मोठी भेट या योजनेद्‍वारे सरकारने दिली आहे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

मावळ तालुका शिवसेनेच्यावतीने येथील शासकीय विश्राम गृहाच्या प्रांगणात सोमवारी (ता. ८) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात अर्ज भरण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‍घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुकाध्यक्ष नारायण ठाकर, तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, नायब तहसीलदार गणेश तळेकर, शिवसेना विभाग प्रमुख धनंजय नवघणे, सुनील मोरे, अक्षय येळवंडे, शुभांगी कळांगे, कविता हुलावळे, संतोषी खांडभोर आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, ‘‘राज्यातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली आहे. या योजनेमुळे गोर गरीब महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.’’
माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले की, ‘‘सरकारने या योजनेतील इतर जाचक अटी शर्ती काढल्याने राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.’’ अंतिम मुदतीपूर्वीच महिलांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिलांना नोंदणी अर्जांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार देशमुख यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी प्रास्ताविक केले. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाधिकारी विशाल कोतागडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT