पिंपरी-चिंचवड

जिल्हा परिषदेच्या शाळांची चौकशी करण्याची मागणी

CD

वडगाव मावळ, ता. १० ः नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावरून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची दयनीय शैक्षणिक कामगिरी लक्षात घेता भविष्य काळात जिल्हा परिषद शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होवू शकतो. जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरत असल्याने याची तत्काळ उच्च स्तरीय चौकशी करून त्यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

म्हाळसकर यांनी याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नागरिक आपले पाल्य मोठ्या आशेने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी पाठवीत आहेत. कुटुंबाची आर्थिक स्थिती व इतर बाबींच्या अडचणी असल्यामुळे ते आपल्या पाल्यास शहरात शिक्षणासाठी पाठवत नाहीत. नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल पाहता संपूर्ण तालुक्यामधून जिल्हा परिषदेच्या शाळेतून उत्तीर्ण झालेले ३५ विद्यार्थी असून त्यात खासगी शाळेचे वीस विद्यार्थी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे पंधरा विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी एकट्या पिंपळोली शाळेतील आहे. उर्वरित सात विद्यार्थी तालु‌क्यातील इतर शाळांमधील आहेत. तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. गेल्या तीन वर्षापासून लोकप्रतिनिधी नसल्याने शिक्षण विभाग स्थूल झालेला आहे. वेळोवेळी शाळांना भेट देवून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शैक्षणिक दर्जाची तपासणी होणे गरजेचे आहे. ते होत नसल्यामुळे कामचुकार शिक्षकांचे फावले आहे. ज्या शाळांचा शून्य टक्के निकाल लागला याची देखील चौकशी व्हावी जेणेकरून यापुढील काळामध्ये मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल. या दृष्टीने कडक पावले उचलण्यात यावीत अशी मागणी म्हाळसकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Sports News: महाराष्ट्र केसरी विजेत्यांचा शड्डू ऑलिंपिकमध्ये घुमेना, मराठी मल्ला मागे का पडतात?

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Indian Theatre Documentary 1988 : भारतीय नाट्य परंपरेचा दस्तऐवज; जब्बार पटेल यांचा 'इंडियन थिएटर' लघुपट

SCROLL FOR NEXT