Maval Vidhansabha esakal
पिंपरी-चिंचवड

Maval Vidhansabha: मावळ विधानसभेची जागा काँग्रेसला देण्याची मागणी, ६ जण करणार अर्ज

Maval Vidhansabha congress: पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. या सर्व इच्छुकांचे अर्ज जिल्हा कॉंग्रेस समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला

CD

वडगाव मावळ, ता. १२ ः मावळ तालुका हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मावळची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय मावळ तालुका काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, पक्षाच्या सहा जणांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने राज्यातील २८८ जागांवर उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने मावळ तालुका काँग्रेसच्यावतीने गुरुवारी येथे बैठकीचे आयोजन केले होते.

पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, संपर्क प्रमुख राजू शिंदे, माजी अध्यक्ष रोहिदास वाळुंज, युवक अध्यक्ष राजेश वाघोले, ॲड. खंडुजी तिकोने, विशाल वाळुंज, एकनाथ येवले, संभाजी राक्षे, सहादू आरडे, गफुर भाई शेख, संभाजी लेंडघर, भरत दळवी, महिला अध्यक्ष पुष्पाताई भोकसे, रूपाली क्षीरसागर, प्रतिभा हिरे, जयश्री मदगे आदी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची चाचपणी करण्यात आली. यावेळी पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. या सर्व इच्छुकांचे अर्ज जिल्हा कॉंग्रेस समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील बैठक २० ते २३ तारखेच्या दरम्यान आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मावळ तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT