पिंपरी-चिंचवड

वडगावातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन

CD

वडगाव मावळ, ता. ३० : गेल्या काही दिवसांपासून वडगाव शहरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उद्योग व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व भाजपने केली आहे. या बाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून, येथे तालुक्यातील नागरिकांची कायम वर्दळ असते. प्रामुख्याने तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, दुय्यम निबंधक, तलाठी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ अशी अनेक मुख्य शासकीय कार्यालय आहे. येथे अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय व व्यापार विजेवर अवलंबून आहेत. तालुक्यातून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध कामांसाठी येथे येत असतात. पाऊस असो अथवा नसो गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा दिवसा व रात्री सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. उद्योग व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. व्यापारी वर्ग, शालेय विद्यार्थी, महिला व नागरिक हे वारंवार लाइट जात असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन शहराचा वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अधिकाऱ्यांशी चर्चा
उद्योजक राजेश बाफना, खंडूशेठ भिलारे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभारी अतुल राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ धोंगडे आदींनी महावितरणच्या विविध समस्यांसंदर्भात शहरातील वारंवार लाइट जाणे, विविध ठिकाणी तारा तुटणे, ग्रामीण भागात डीपी चोरीला जाणे, फ्यूज जाणे या समस्यांवर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता परदेशी यांची भेट घेऊन चर्चा केली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

भाजपचा टाळे ठोकण्याचा इशारा
वडगाव शहर भाजपच्या वतीने माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ ढोरे, शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, माजी अध्यक्ष अनंता कुडे, नारायण ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष अतिश ढोरे, विनायक भेगडे, अतुल म्हाळसकर, विवेक धर्माधिकारी, प्रदीप बवरे, चंद्रकांत पवार आदींनी परदेशी यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तीन दिवसात कार्यवाही न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT