मावळातील विविध गावांसाठी
४४ कोटींचा निधी मंजूर
खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
वडगाव मावळ, ता. ९ : मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये पूर व दरड प्रतिबंधक उपयोजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ४४ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
बारणे यांनी सांगितले की, मावळमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी, पूर प्रवण क्षेत्र आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या दुर्घटनेत मृत्यू होतात. पावसाळ्यात रस्ते बंद करावे लागतात. त्यामुळे मावळ तालुक्यात दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी निधी मिळावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. ४४ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात वाऊंड येथे दरड प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधण्यासाठी एक कोटी ५९ लाख, वडेश्वर एक कोटी २३ लाख ८८ हजार, फळणे एक कोटी दोन लाख ३८ हजार, मालेवाडी एक कोटी ५१ लाख ४५ हजार, वाकसई-देवघर दोन कोटी ६९ लाख ४६ हजार, आतवण ९६ लाख ५७ हजार, साई ९१ लाख, शिलाटणे एक कोटी १६ लाख ६७ हजार, पांगळोली ४५ लाख ४९ हजार, पाटण एक कोटी ५३ लाख ७० हजार, दुधिवरे सात कोटी ६४ लाख ६८ हजार, भाजे सात कोटी ६४ लाख ६८ हजार, मोरवे ६० लाख ११ हजार, वेहेरगाव दोन कोटी ६३ लाख ५३ हजार, तुंग चार कोटी ६१ लाख रुपये असा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.