पिंपरी-चिंचवड

मावळातील गावोगावी पोचली मतदान यंत्रणा

CD

वडगाव मावळ, ता. १९ : मावळ विधानसभा मतदार संघात मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, मतदान साहित्य मंगळवारी पोलिस बंदोबस्तात संबंधित मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. मतदार संघातील सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मावळ विधानसभा मतदार संघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात विद्यमान आमदार सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस), श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे (अपक्ष), रवींद्र वाघचौरे (भीमसेना), मुकेश आगरवाल (अपक्ष), गोपाळ तंतरपाळे (अपक्ष), पांडुरंग चव्हाण (अपक्ष) यांचा समावेश आहे. शेळके व भेगडे यांनी गेल्या पंधरा दिवसांत जोरदार प्रचार यंत्रणा राबवून मतदार संघ पिंजून काढल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

मतदारसंघाची स्थिती
- तीन लाख ८६ हजार १७२ मतदार
- एक लाख ९७ हजार ४३६ पुरुष
- एक लाख ८८ हजार ७२३ महिला
- तालुक्यात ४०२ मतदान केंद्रांची व्यवस्था
- प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी असतील
- मतदान केंद्रावर बाराशेपेक्षा जास्त मतदार
- एक अतिरिक्त मतदान अधिकारी असेल.

या असतील सुविधा
- सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र व मतदान विषयक साहित्याचे मंगळवारी वाटप
- बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे आदी साहित्याचे वाटप
- ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअरचे देखील वाटप
- सर्व साहित्य व कर्मचारी पोलिस बंदोबस्तात संबंधित मतदान केंद्रांवर रवाना
- मोठ्या बस, मिनी बस, छोटी वाहनांतून व्यवस्था
- सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच पूर्ण

मतदान करण्याचे आवाहन
मावळ विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात मतदान होणार आहे. मतदारांनी मतदान ओळखपत्र अथवा ओळखीच्या बारा पुराव्या पैकी एक पुरावा घेऊन मतदान केंद्रावर जावे. जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे. बंदी असल्याने मोबाईल मात्र घरीच ठेवावा अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT