पिंपरी-चिंचवड

वडगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे

CD

वडगाव मावळ, ता. ११ ः आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.

वडगाव शहरामध्ये विद्यार्थिनी, महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी वडगाव पोलिस स्टेशनने काही वर्षांपूर्वी नगरपंचायतीकडे केली होती. शहरातील महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या विषयाला १७ मार्च २०२३ मध्ये सभेत मान्यता देण्यात आली होती. नगरपंचायत फंडातून सुमारे एक कोटी ५७ लाख इतका निधी मंजूर झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली.

शहरामधील पंचायत समिती चौक, वडगाव न्यायालय, श्री पोटोबा महाराज मंदिर, जामा मस्जिद परिसर, भाजी मंडई, खंडोबा चौक, महादजी शिंदे उद्यान या ठिकाणी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात शहरातील कातवी, विशाल लॉन्स, माळीनगर, न्यू इंग्लिश स्कूल, केशवनगर आदी काही मुख्य चौकांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम व माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे महिला छेडछाड, चैन स्नॅचिंग, चोरी, हाणामारी यासारख्या घटनांना आळा बसून सुरक्षेमध्ये निश्चितच वाढ होऊन शहरवासीयांना मोठा दिलासा मिळेल. शहराच्या दृष्टीने हा खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प असून प्रकल्प अहवालानुसार पूर्ण सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नगरपंचायत फंडा व्यतिरिक्त आमदार सुनील शेळके यांनी आमदार निधीमधून तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT