पिंपरी-चिंचवड

वडगावमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात

CD

वडगाव मावळ, ता. १३ : वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्यातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली. वडगाव शहरात विद्यार्थिनी, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी वडगाव पोलिस ठाण्याने काही वर्षांपूर्वी नगरपंचायतीकडे केली होती.
शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या विषयाला १७ मार्च २०२३ मध्ये सभेत मान्यता देण्यात आली होती. नगरपंचायत फंडातून सुमारे एक कोटी ५७ लाख इतका निधी मंजूर झाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली. शहरातील पंचायत समिती चौक, वडगाव न्यायालय, श्री पोटोबा महाराज मंदिर, जामा मज्जिद परिसर, भाजी मंडई, खंडोबा चौक, महादजी शिंदे उद्यान या ठिकाणी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पुढील काही दिवसांत शहरातील कातवी, विशाल लॉन्स, माळीनगर, न्यू इंग्लिश स्कूल, केशवनगर आदी काही मुख्य चौकामध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम व मयूर ढोरे यांनी दिली.

वडगाव मावळ : शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाची पाहणी करताना मयूर ढोरे, पोलिस निरीक्षक कुमार कदम व नगरपंचायतीचे अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT