पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारचे दुर्लक्ष

CD

वडगाव मावळ, ता. ४ : राज्यासह मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत मावळ तालुका काँग्रेस पक्षाने वडगाव येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (ता.३) मोर्चा काढला.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून काढण्यात आलेल्या मोर्चात ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, बाळासाहेब ढोरे, ॲड. खंडूजी तिकोने, राजू शिंदे, राजेश वाघोले, महादू खांदवे, रुपाली क्षीरसागर, वैशाली फाटक आदींसह कार्यकर्ते सहभागी होते.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवर अत्याचार वाढत आहेत. युती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अजूनही करण्यात आलेली नाही, असा आरोप यावेळी कोपरा सभेत करण्यात आला.
यासह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांना न्याय द्यावा, पवना धरणग्रस्त व तालुक्यातील इतर धरणग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, भूखंडाचे वाटप तातडीने करावे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना तातडीने सुरू कराव्यात. भूमी अभिलेख कार्यालयातील शेतकऱ्यांची कामे, मोजणीची प्रकरणे मार्गी लावावीत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत मोठा ट्वीस्ट, अमोल कोल्हे आणि मधुराणीची एन्ट्री, नेटकरी म्हणाले...'दोघेही हुबेहूब...'

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

SCROLL FOR NEXT