पिंपरी-चिंचवड

विसापूर गडाच्या पायथ्याशी साकारले बजरंगबलीचे मंदिर

CD

वडगाव मावळ, ता. ४ : नाणे व पवन मावळच्या सीमेवर असलेल्या मालेवाडी गावाशेजारी तसेच विसापूर गडाच्या पायथ्याशी गर्द झाडाझुडूपात ‘सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमधील दुर्गसेवकांच्या अथक प्रयत्नातून बजरंगबलीचे सुंदर मंदिर साकारले असून, या मंदिरात येत्या रविवारी (ता. ९) मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.
सप्टेंबर २०२२मध्ये मावळ तालुक्यातील ‘सफर ३६१ गडांची सामाजिक प्रतिष्ठान’मधील दुर्गसेवक विसापूर गडावर चालले होते. त्यावेळी सह्याद्री रांगेवर वसलेल्या मालेवाडीशेजारील विसापूरच्या वाटेवर त्यांना कसलाही निवारा नसलेली बजरंगबलीची मूर्ती व चौथऱ्याचे काही दगड झाडाझुडूपांत विखुरलेल्या अवस्थेत दिसले. या मूर्तीसाठी सुंदर मंदिर बनविण्याचा संकल्प या दुर्गसेवकांनी केला व डिसेंबर २०२२मध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरवात झाली. मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड गावा-गावांमधून जुन्या पडक्या घरांचे, मंदिरांचे जमा करून आणण्यात आले. मावळ तालुक्यातील नेते, व्यावसायिक तसेच तरुणांनी या मंदिराच्या बांधकामासाठी पैसे व बांधकाम साहित्य पुरविले. मंदिरापर्यंत रस्ता नसल्याने मालेवाडीतून भर पावसात, चिखल तुडवत मंदिरासाठी लागणारे साहित्य डोक्यावर घेऊन व पायपीट करून दुर्गसेवकांनी वाहतूक केली. नुकतेच या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी प्रतिष्ठानचे खंडू धुमाळ, ओंकार केदारी, सागर परब, आकाश लालगुडे, कुणाल टाकळकर, प्रीतम उणवणे, राहुल बोरकर, विजय केदारी, सोमनाथ सातकर, दिलीप शिंदे, परशुराम बांगर, योगेश गायकवाड, अभिषेक सातकर, नवनाथ केदारी, शंकर जाधव, रवी केदारी, सोमनाथ म्हसे, सुधीर वाजे, सुधीर तळावडे, विठ्ठल गायकवाड, दीपक पितांबरे यांनी कष्ट करून मंदिर साकारण्याचे स्वप्न पूर्ण केले. रविवारी मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे व त्यानंतर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
नूतन मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना समारंभानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ७) मंदिरात विविध धार्मिक विधी, शनिवारी (ता. ८) सायंकाळी मशाल महोत्सव, शिवपूजा, जलाभिषेक व आरती, रविवारी (ता. ९) सकाळी महापूजा, पालखी मिरवणूक, मंदिर उद्‍घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना समारंभ होईल. यानिमित्त इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे यांचे व्याख्यान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT