वडगाव मावळ, ता.२५ : येथील मोरया प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सफर गडदुर्गांची या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने शंभूराजांना अभिवादन करण्यासाठी वडगाव शहरातील सुमारे चारशे मुला-मुलींना वढू आणि तुळापूर या पवित्र भूमीचे दर्शन घडविण्यात आले.
वडगावचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या पुढाकारातून प्रत्येक महिन्याला वडगाव शहरातील मुलांना गडदुर्ग पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची व कवी कलश यांच्या समाधीचे सर्वांनी दर्शन घेतले. इतिहास अभ्यासक निलेश भिसे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट मुलांना खूप साध्या व सोपे भाषेमध्ये समजावून सांगितला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.