पिंपरी-चिंचवड

वडगावमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्राची चोरी

CD

वडगाव मावळ, ता. १३ : एका अज्ञात महिलेने येथील एका गृहिणीच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना येथील पोटोबा मंदिर परिसरात घडली. ज्योती लोकरे (वय ३५, रा. लक्ष्मी सोसायटी, दिग्विजय कॉलनी, वडगाव) यांनी याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येथील पोटोबा मंदिराजवळ कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर लोकरे या महाप्रसादासाठी महिलांच्या रांगेत उभ्या असताना अनोळखी महिलेने (वय अंदाजे ४० ते ४५) त्यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार आशिष काळे पुढील तपास करत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाने तेलदरात उसळी

SCROLL FOR NEXT