पिंपरी-चिंचवड

वडगावच्या गावजत्रेत पावसाचा धुमाकूळ

CD

वडगाव मावळ, ता.१३ : मावळ तालुक्यातील वडगाव, नाणोली, तळेगाव दाभाडे आणि कामशेत भागांत अवकाळी पावसाने रविवारी (ता.१३) अचानक हजेरी लावली. वडगावात ऐन गावजत्रेच्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने संयोजकांना कुस्त्यांचा आखाडा रद्द करावा लागला. कामशेतमध्ये गारांचा पाऊस झाला.तर नाणोलीत अनेक
वीजेचे खांब कोसळले.
वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा चैत्र पौर्णिमा उत्सवाचा रविवारी दुसरा दिवस होता. संध्याकाळी निकाली कुस्त्यांच्या आखाडा नियोजित होता. परंतु संध्याकाळी चार वाजल्यापासून वातावरणात अचानक बदल झाला. सकाळपासून निरभ्र असलेल्या आकाशात काळे ढग दाटून आले व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे गावजत्रेतील दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली. काही दुकानदारांचे सामान भिजल्यामुळे नुकसान झाले. काही ठिकाणी स्वागताचे लावण्यात आलेले फलक पडले. कुस्ती आखाड्याचे पूजन करून नुकतीच कुस्त्यांना सुरुवात झाली होती. लहान गटातील काही कुस्त्याही झाल्या होत्या. मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे कुस्त्या थांबवाव्या लागल्या. मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने अखेर कुस्त्यांचा आखाडा रद्द करण्यात आला. शहराचा वीज पुरवठाही काही काळ खंडित झाला होता. वीज यंत्रणेत बिघाड झाल्याने जत्रेच्या पहिल्या दिवशीही पहाटेपासून दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. तर दुसऱ्या दिवशी पावसामुळे गाव जत्रेच्या आनंदावर विरजण पडले. बाल गोपाळांचा मोठा हिरमोड झाला. वादळी वाऱ्यामुळे काही घरे व गोठ्यावरील पत्रे उडाले.

नाणोलीत विजेचे खांब कोसळले
जोरदार वारा, गारांचा पाऊस झाल्याने नाणे मावळ भागातील नाणोली परिसरातील महावितरणच्या मुख्य वाहिनीचे पाच वीजेचे खांब पडून मोठे नुकसान झाले. माऊलीनगरहून पारवडीमार्गे आलेली ही सर्वात जुनी वीज वाहिनी आहेत. हे वीजेचे खांब जमिनीलगत जीर्ण झाले होते. प्रचंड वाऱ्याने हे खांब जमिनीवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. जुन्या यंत्रणेमुळे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला वीजेच्या तारा तुटणे, वीजेचे खांब वाकणे, तुटणे अशा घटना घडतच असतात. पावसाळ्याच्या अगोदर महावितरणने हे सर्व जीर्ण खांब बदलावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

वीज गायब, बाजारात धांदल
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे परिसरात रविवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजता वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अचानक बरसलेल्या जोरदार अवकाळी पावसाने नागरिकांसह आठवडे बाजारात चांगलीच धांदल उडवून दिली.
तळेगाव स्टेशन परिसरातील काही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी तुंबून दुकानांत शिरले. त्यामुळे व्यावसायिकांचे हाल झाले. तळेगावातील बालविकास शाळेजवळ आंब्याचे एक मोठे झाड मुळासकट उन्मळून रस्त्यावर आडवे पडले. चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकात लावलेले फलक (फ्लेक्स) वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळले. यशवंतनगरमधील अंतर्गत रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यामुळे पथदिव्यांचा खांब वाकून रहदारी काही काळ विस्कळीत झाली. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून वीजवाहक तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. अर्धा-पाऊण तासात झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला. त्याने गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या प्रचंड उकाड्यातून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.

कामशेतमध्ये गारांचा पाऊस
तळेगाव दाभाडे ः कामशेत शहरात रविवारी पाचच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊन गारा पडल्या.
कामशेत शहरात खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी असते. उन्हाळ्याच्या दिवसांत मिरची व मसाल्याच्या पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. मात्र अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी धांदल उडाली.



VDM25B09491, VDM25B09487, TLS25B05713

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

Latest Marathi News Live Update : ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT