पिंपरी-चिंचवड

दोन हजार लाभार्थी अनुदानापासून वंचित

CD

वडगाव मावळ, ता. २७ : आधार व्हेरिफिकेशन, बँक खाते केवायसी नसणे आदी तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्यामुळे मावळ तालुक्यातील सुमारे दोन हजार (४० टक्के) लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळू शकला नाही. अनेक लाभार्थी निरक्षर असल्याने त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास अवघड जात आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, निराधार विधवा भगिनी, निराधार बालक-पालक व दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना अनुदान दिले जाते. तसेच, श्रावण बाळ सेवा निवृत्तिवेतन योजनेतून ६५ वर्षांवरील निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो. मावळ तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार ९७३ तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे १ हजार ५७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना दरमहा नियमितपणे व वेळेवर अनुदान मिळाल्यास त्यांच्या आर्थिक अडचणीत हातभार लागतो. मात्र, या दोन्ही योजनेतील सुमारे दोन हजार लाभार्थी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून लाभापासून वंचित आहेत. त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे ते चौकशीसाठी येथील तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित
तहसीलदार विक्रम देशमुख व या योजनेच्या नायब तहसीलदार जयश्री मांडवे यांनी सांगितले की, ‘‘पूर्वी या योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान धनादेशाद्वारे तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाकडे येत असे. त्यानंतर ते लाभार्थ्यांना दिले जात होते. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत असे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जात आहे. तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या २ हजार ३७७ लाभार्थ्यांना तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या ७४३ लाभार्थ्यांना मे महिन्यापर्यंतचे अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही योजनेतील सुमारे दोन हजार (४० टक्के) लाभार्थ्यांचे अनुदान तांत्रिक बाबींमुळे मिळालेले नाही. आधार व्हेरिफिकेशन नसणे, लाभार्थ्यांचे आधार, पॅन कार्ड व मोबाइल नंबर लिंक नसणे, बँकेतील बँक खात्याला मोबाइल नंबर व आधार लिंक नसणे, मोबाइल नंबर बदलणे, संयुक्त बँक खाते असल्याने अनुदानाची रक्कम दुसऱ्या खात्यावर जाणे आदी बाबींमुळे लाभ मिळू शकला नाही. लाभार्थ्यांनी या बाबींची पूर्तता करून घेतल्यास शासनाकडून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यासाठी सायबर कॅफे अथवा आधार कार्ड केंद्रात जाऊन आधार व्हेरिफिकेशन करून घेणे तसेच संबंधित बँकेत जाऊन केवायसी करून घेणे गरजेचे आहे. लाडकी बहीण आणि संजय गांधी या दोन्ही योजनांचा लाभ काही लाभार्थ्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांचे या योजनेचे पेमेंट अडकले आहे.

‘‘आधार व्हेरिफिकेशन, बँक खाते केवायसी नसणे आदी तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्यामुळे काही लाभार्थ्यांचे अनुदान रखडले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना मार्गदर्शन व मदत केली जात आहे. गेल्या पाच महिन्यांत संजय गांधी योजनेच्या २ हजार ८५८ लाभार्थ्यांचे तर श्रावण बाळ योजनेच्या ७०८ लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन करून घेतले व त्यांना मे पर्यंतच्या अनुदानाचा लाभ मिळवून दिला. संजय गांधी योजनेच्या १ हजार ११५ व श्रावण बाळ योजनेच्या ३४९ लाभार्थ्यांची प्रक्रिया बाकी असून, त्यांनाही त्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जाईल.
- जयश्री मांडवे, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना

‘‘मावळ तालुक्यातील अनेक निराधार विधवा, निराधार वृद्ध, अपंग व्यक्तींना गेल्या चार-पाच महिन्यांपासून संजय गांधी योजनेचे अनुदान न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या लाभार्थ्यांना दर महिन्याला नियमितपणे अनुदानाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. अनेक लाभार्थी निरक्षर असल्याने त्यांना आधार व्हेरिफिकेशन व बँक खाते केवायसी यासारखी प्रक्रिया करणे अवघड जात आहे. त्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे.
- प्रकाश क्षीरसागर, लाभार्थी

‘‘काही लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन न झाल्याने त्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. या लाभार्थ्यांनी आधार कार्ड, आधारला लिंक असलेले मोबाइल नंबर व दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र घेऊन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे जमा करावे किंवा शक्य असल्यास वडगाव येथील कार्यालयात मोबाइलसह सोमवार ते शुक्रवार ११ ते ५ या वेळेत उपस्थित राहावे.
- नारायण ठाकर, माजी अध्यक्ष, मावळ तालुका संजय गांधी निराधार योजना समिती
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT