पिंपरी-चिंचवड

मावळातील धरणे यंदा जूनमध्येच पाणीदार

CD

वडगाव मावळ, ता.२५ : मावळ तालुक्यात मे पासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन बिघडले आहे. पण, तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये मुबलक साठा झाला आहे. त्यामुळे किमान सहा महिन्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता मात्र मिटली आहे. बऱ्याच वर्षांनंतर जूनमध्ये एवढा मोठा पाणी साठा झाला आहे. जनावरांनाही हिरवा चारा लवकरच उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे.
मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता संपूर्ण जून महिना कोरडाच गेलेला दिसून येतो. यंदा मात्र मेच्या मध्यापासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली. एवढ्या लवकर पाऊस येईल याचा अंदाज नसल्याने शेतकरी वर्ग काहीसा गाफील राहिला. त्यातच पावसाने उसंत न दिल्याने शेती मशागतीची व खरीप पिकांच्या पेरणीची कामे मागे पडली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतात वाफसा मिळालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. त्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. ओढे व नद्या नाल्यांना पूर येऊन अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. भात खाचरे पुन्हा पाण्याने तुडुंब भरली. खाचरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेल्या शेतकऱ्यांना पेरणीची संधीच मिळाली नाही.

लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब
यंदा जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चार पट अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे जाधववाडी, मळवंडी ठुले, कासारसाई, पुसाणे हे लघु पाटबंधारे प्रकल्प भरून गेले आहेत.


धरणे आणि पाणीसाठा
पवना धरण : यंदा हे धरण जूनमध्येच ५२.२७ टक्के भरले आहे. धरण परिसरात आतापर्यंत ६९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी २५ जूनपर्यंत धरणात जेमतेम १९ टक्के पाणी साठा होता. तर १८० मिलिमीटर पाऊस झाला होता. या धरणातून पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो.

वडिवळे धरण : या धरणात ७८.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात आतापर्यंत ७५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी धरणात ३७ टक्के पाणीसाठा होता. तर, जेमतेम १४० मिलिमीटर पाऊस झाला होता.

आंद्रा धरण : ६५.३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात आत्ता पर्यंत ६५.३४ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेर धरणात जेमतेम २३ टक्के पाणी साठा शिल्लक होता.

लोणावळा शहर : यंदा आतापर्यंत १ हजार ६१८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ४५० मिलिमीटर होते.

PVN25B02212

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT