वडगाव मावळ, ता. १ : पंढरपूर येथे पायी वारी करणाऱ्या भाविकांना सुमारे तीन हजार ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) पावडरच्या पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. इंदापूर येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांना ही मदत भाजपतर्फे करण्यात आली. मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडी व वडगाव येथील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडी यांना देखील हे वाटप करण्यात आले. माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, संभाजीराव म्हाळसकर, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे सचिव अनंता कुडे, विश्वस्त अरुण चव्हाण,नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे, अजय शहा, किरण म्हाळसकर, भूषण मुथा, महेंद्र म्हाळसकर, अमोल धिडे, संभाजीराव येवले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.