वडगाव मावळ, ता. ३० : वडगाव शहरात लहान-मोठी सुमारे पंचवीस ते तीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, यावर्षी बहुतेक मंडळांनी देखावे टाळून सजावटीवर भर दिला आहे. काही मंडळांनी महिला व मुलांसाठी विविध स्पर्धा, आरोग्य, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना मदत असे विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत.
येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात देवस्थान ट्रस्ट व गणेशोत्सव समितीने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, दररोज भजन, धार्मिक उपक्रमांसह नेत्र तपासणी शिबिर घेतले आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र म्हाळसकर आहेत. देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाने संयोजन केले आहे. जय बजरंग तालीम मंडळाने तालमीत श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे हे ७५ वे वर्ष आहे. मुकुंद वाळुंज अध्यक्ष आहेत. चांदणी चौकातील साईनाथ तरुण मंडळाचे ५२ वे वर्ष आहे. यंदा आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कानिफनाथ सुपेकर अध्यक्ष आहेत. कुंभारवाडा येथील गणेश तरुण मंडळाचे हे ५७ वे वर्ष असून, यंदा कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मंगेश ढोरे अध्यक्ष आहेत. शिवाजी चौकातील जय जवान जय किसान मित्र मंडळाचे हे ५० वे वर्ष असून, केदारनाथ मंदिराची सुरेख प्रतिकृती उभारली आहे. आरोग्य व दंत चिकित्सा शिबिर, कीर्तन, महिलांसाठी लकी ड्रॉ, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान असे विविध सामाजिक कार्यक्रम घेतले आहेत. गणेश वहिले अध्यक्ष आहेत. ढोरेवाडा येथील सिद्धी विनायक मित्र मंडळाचे हे ४१ वे वर्ष असून, फुलांची आकर्षक सजावट केली आहे. अतुल प्रकाश ढोरे अध्यक्ष आहेत. मोरया मित्र मंडळाचे हे ३२ वे वर्ष असून, यंदा आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. वैभव वाडेकर अध्यक्ष आहेत. मधुबन कॉलनीतील श्रीराम मित्र मंडळाचे हे ४६ वे वर्ष असून, सजावट केली आहे. रोहित धडवले अध्यक्ष आहेत. कुडेवाडा येथील कानिफनाथ मित्र मंडळाचे हे ४८ वे वर्ष असून, यंदा कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली आहे. रोहन कुडे अध्यक्ष आहेत. पाटीलवाडा येथील अष्ट विनायक मित्र मंडळाचे हे ४८ वे वर्ष असून, यंदा साई दर्शनाचा देखावा सादर केला आहे. नवनाथ गाडेकर अध्यक्ष आहेत. ढोरे वाडा येथील आदर्श मित्र मंडळाचे हे ४६ वे वर्ष असून, श्रीकांत चांदेकर अध्यक्ष आहेत. चावडी चौकातील जयहिंद मित्र मंडळाचे ४५ वे वर्ष असून, मार्कंडेयची शिवभक्ती हा पौराणिक देखावा सादर केला आहे. प्रशांत चव्हाण अध्यक्ष आहेत. खंडोबा चौकातील जय मल्हार ग्रुपचे हे १७ वे वर्ष असून, स्वामी समर्थांचा देखावा सादर केला आहे. रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सौरभ सावले अध्यक्ष आहेत. पंचमुखी मारुती मित्र मंडळाचे हे २९ वे वर्ष असून, सजावट केली आहे. मंदार जाधव अध्यक्ष आहेत. बवरे वाडा येथील बाल विकास मित्र मंडळाचे हे ५१ वे वर्ष असून, आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. प्रसाद देवघरे अध्यक्ष आहेत. म्हाळसकर वाडा येथील नवचैतन्य तरुण मंडळाचे हे ५१ वे वर्ष असून, आकर्षक सजावट केली आहे. संतोष म्हाळसकर अध्यक्ष आहेत. टेल्को कॉलनीतील योगेश्वर प्रतिष्ठानचे हे ३५ वे वर्ष असून, सजावट केली आहे. प्रवीण पवार अध्यक्ष आहेत. बाजारपेठेतील ओंकार मित्र मंडळाचे हे ४१ वे वर्ष आहे. सजावट केली आहे. दिनेश प्रजापती अध्यक्ष आहेत. क्रांती मित्र मंडळाचे हे ५४ वे वर्ष असून फुलांची सजावट केली आहे. दर्शन वाळुंज अध्यक्ष आहेत. इंद्रायणीनगरमधील इंद्रायणी मित्र मंडळाचे हे ३९ वे वर्ष असून, कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली आहे. अखिलेश तुमकर अध्यक्ष आहेत. माळीनगर येथील माळीनगर मित्र मंडळाचे हे ३४ वे वर्ष असून, सजावट केली आहे. सागर आलम अध्यक्ष आहेत. दिग्विजय मित्र मंडळाचे हे २७ वे वर्ष असून, सजावट केली आहे. नेत्रतपासणी, रक्तदान शिबिर, महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान आदी उपक्रम घेतले आहे. श्रीधर भेगडे अध्यक्ष आहेत. पंचशील मित्र मंडळाचे हे ४१ वे वर्ष असून, कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट केली आहे. गणेश हिंगे अध्यक्ष आहेत. शिवशंभो मित्र मंडळाचे हे २९ वे वर्ष असून, आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. गणेश भिलारे अध्यक्ष आहेत. विजयनगर मित्र मंडळाचे हे ३९ वे वर्ष असून, आकर्षक सजावट केली आहे. जिगर सोलंकी अध्यक्ष आहेत. मयुरेश्वर कॉलनीतील नव मयुरेश्वर मित्र मंडळाने यंदा विधायक उपक्रमांवर भर दिला आहे. अथर्व वाघमारे अध्यक्ष आहेत.
केशवनगरमधील शितळादेवी मित्र मंडळाचे हे २२ वे वर्ष असून, आकर्षक सजावट केली आहे. दिनेश शिंदे अध्यक्ष आहेत. वक्रतुंड मित्र मंडळाचे ११वे वर्ष असून, अष्टविनायक दर्शन देखावा केला आहे. नवनाथ नरुटे अध्यक्ष आहेत. याशिवाय भैरवनाथ मित्र मंडळ, एकवीरा मित्र मंडळ, महालक्ष्मी मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, झोटिंगबाबा मित्र मंडळ आदी मंडळांनीही सजावटीवर भर देऊन सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.