पिंपरी-चिंचवड

वडगावात आठ तास गुलालविरहीत विसर्जन मिरवणूक

CD

वडगाव मावळ, ता.३ : वडगावमधील सात दिवसांच्या गणेशोत्सवाची मंगळवारी (ता.२) उत्साहाच्या वातावरणात सांगता झाली. काही अपवाद वगळता बहुतांशी मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषेत ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष करत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले. मंडळांनी गुलालाचा वापर टाळला. सुमारे आठ तास ही मिरवणूक चालली.
संध्याकाळी साडेपाच वाजता ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरातील गणरायाच्या आरतीने विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजी चौकामधील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या अग्रभागी श्री पोटोबा महाराज देवस्थान व जय बजरंग तालीम मंडळ हे मानाचे गणपती होते. त्यासोबत सिद्धिविनायक मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, जय मल्हार, बाल विकास मित्र मंडळ, जय जवान जय किसान मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ, आदर्श मित्र मंडळ, नवचैतन्य तरुण मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, कानिफनाथ तरुण मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, विजयनगर, योगेश्वर प्रतिष्ठान, पंचमुखी मारुती मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, शिवशंभो मित्र मंडळ, पंचशील मित्र मंडळ ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली. पोटोबा देवस्थान, बाल विकास, जयहिंद, कानिफनाथ, साईनाथ, योगेश्वर, पंचमुखी, शिवशंभो या मंडळांनी मिरवणुकीसाठी ढोल - ताशा पथकांचा तर श्रीराम, दिग्विजय, इंद्रायणी मित्र मंडळाने ढोल - लेझीम पथकांचा वापर केला. अष्टविनायक व श्रीराम मंडळात बँड पथकाचा सहभाग होता. जय जवान, गणेश, आदर्श व पंचशील मंडळाने ‘डीजे’ला पसंती दिली.
श्रीराम, पंचशील, कानिफनाथ, साईनाथ, पंचमुखी, अष्ट विनायक, गणेश, नवचैतन्य या मंडळांनी ट्रॅक्टरवर आकर्षक सजावट केली होती. मोरया, कानिफनाथ, झिटूम बाबा, रूद्र, साई गर्जना, समर्थ आदी ढोल ताशा पथकांनी आपल्या वाद्य कलेने मिरवणुकीची शोभा वाढवली. एक वाजण्याच्या सुमारास सर्व मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले.


तिलकधारी ग्रुपचे आकर्षण
अमृत महोत्सव साजऱ्या करणाऱ्या जय जवान जय किसान मित्र मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी तिलकधारी ग्रुप मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. महादेव नंदी, कांतारा, महाकाल शंकर, अघोरी महाकाल तांडव आदी रूपे व नृत्ये त्यांनी सादर केली. या मंडळात फेटाधारी महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.

प्रमुख वैशिष्ट्ये
- पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने उत्साह शिगेला
- बहुतांश मंडळांनी ‘डीजे’चा वापर टाळल्याने समाधान
- सिद्धिविनायक मित्र मंडळाकडून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या प्रतिमेची सजावट
- इंद्रायणी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत गाय-वासराची भव्य मूर्ती, महिलांकडून गोहत्या बंदीबाबत जनजागृती
- गुलालाऐवजी तोफेतून कागदी फुलांचा वर्षाव
- नवचैतन्य मित्र मंडळांच्या मिरवणुकीत आळंदीतील बाल वारकऱ्यांच्या दिंडी पथकाचा सहभाग
- बहुतेक मंडळांनी मिरवणुकीसाठी विद्युत रोषणाई रथ, कृत्रिम फुलांच्या सजावटीचा वापर
- ‘मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात तरुणाई थिरकली
- गजानन मित्र मंडळाकडून मंडळांना रोपे वाटप करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश


गणेश मंडळांचा सत्कार
मिरवणूक मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मोरया प्रतिष्ठान, भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मनसे यांच्यावतीने मंडळांचे अध्यक्ष व वाद्य पथक प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. नवमयुरेश्वर, ओंकार, वक्रतुंड, शितळादेवी, श्रीमंत महादजी शिंदे, भैरवनाथ दत्तनगरी, छत्रपती शिवाजी आदी मंडळांनी मुख्य मिरवणुकीपूर्वी दुपारीच स्वतंत्रपणे विसर्जन केले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

VDM25B10468

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, ८५ जागांवर आघाडीवर, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

IND vs SA मालिका कुलदीप यादव अर्ध्यावर सोडणार? BCCI कडे मागितलीये सुट्टी, कारण घ्या जाणून

CM Mohan Yadav: सीएम डॉ. मोहन यांनी अन्नदात्याला दिला मोठा दिलासा; १.३३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३३ कोटी रुपये हस्तांतरित

Crime News : येवल्यात चोरट्यांचा धुमाकूळ! बाजीरावनगरमध्ये घरफोडी, वाईबोथीत भरदिवसा शेतकऱ्याचे घर फोडले

Happy Children's Day: बालदिनानिमित्त मजेशीर AI प्रॉम्प्ट्स; Google Gemini Nano Banana वापरून मुलांसाठी तयार करा क्यूट फोटोज

SCROLL FOR NEXT