पिंपरी-चिंचवड

वडगावातील गोळीबार प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

CD

वडगाव मावळ, ता.९ : केशवनगर भागात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अगोदर झालेल्या भांडणाच्या कारणावरून एक जणावर गोळीबार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत. दरम्यान, या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
सौरभ रोहिदास वाघमारे (रा.कुरकुंडे, ता. खेड, जि.पुणे), अभिजीत राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ(दोघेही रा. सांगवी, ता. मावळ) व प्रथमेश दिवे (रा.तळेगाव दाभाडे) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय एकनाथ मोहिते (वय २८, रा. पवारवस्ती, केशवनगर, वडगाव मावळ ) यांनी फिर्याद दिली आहे. वडगावचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहिते यांचा चुलत भाऊ हा वडगाव येथील एका शाळेत दहावीमध्ये शिकतो. त्याने अभिजित व रणजित यांच्या भावकीतील मुलीला शाळेतून तिच्या घरी सोडले. त्यावरून आरोपींनी त्याला शाळेच्या बाहेरून मोटारीमध्ये घेऊन मारहाण केली. त्यावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अक्षय हा त्याच्या मित्रांसह केशवनगर येथील एकवीरा चौकात बसलेले असताना चारही आरोपी तेथे दुचाकीवरुन आले. सौरभ याने शिवीगाळ करून लगेच पिस्तुल बाहेर काढून ते अक्षयच्या दिशेने झाडले. परंतु त्यामधून गोळी निघाली नाही. अक्षय व त्याचे मित्र तिथून पळून जात असतानाच आरोपीने पुन्हा एकदा गोळी झाडली. परंतु अक्षयला गोळी लागली नाही. तो जवळच असलेल्या सोसायटीत जाऊन लपून बसला. त्यानंतर सर्व आरोपी तिथून दुचाकीवरुन पळून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

कोकणात 'या' ठिकाणी झालंय 'विसरू नको तू मला' या मालिकेचं शूटिंग; भारावलेला शाल्व म्हणाला, 'इथे फक्त फिरायला आलेलो पण...'

Jio, Airtel, Vi की BSNL...कोणतं सिमकार्ड आहे बेस्ट? 'ही' कंपनी देते जास्त ऑफर्स अन् जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स, नेटवर्कही एकदम टॉप

SCROLL FOR NEXT