पिंपरी-चिंचवड

माहिती अधिकार कायद्यामुळे कामकाज पारदर्शक

CD

वडगाव मावळ, ता. १ : माहिती अधिकार कायद्यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आली आहे. ते अधिक लोकाभिमुख होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हा कायदा लोकशाहीमध्ये मैलाचा दगड ठरला आहे, असे प्रतिपादन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केले.
मावळ पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता.२७) माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, राज्य जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव, संघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काजळे, राज्य ग्राहक पंचायतीचे सचिव अरुण वाघमारे, सचिव सुनील गुजर, मच्छिंद्र गुजर, प्रभाकर वाघमारे, दत्तात्रय दळवी, काळूराम भोंडवे, सतीश ढमाले, लक्ष्मण खांडभोर, बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय पाटील, कृषी अधिकारी संताजी जाधव, गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, कविता पाटील आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी प्रधान यांनी प्रास्ताविकात माहिती अधिकार अधिनियम २००५ ची पार्श्वभूमी विषद केली. सुनील गुजर यांनी माहिती अधिकार अधिनियम कलमांची सविस्तर माहिती दिली. नितीन यादव यांनी माहिती अधिकार अंमलबजावणी व उपलब्ध करून द्यावयाच्या माहितीबाबत मार्गदर्शन केले. कार्यालयात प्रदर्शित करावयाचे फलक, विविध नोंदवही, माहिती अधिकारात कोणती माहिती देता येते व देता येत नाही, नागरिकांची सनद, कर्मचारी व अधिकारी वेतनफलक, तक्रार पेटी, हालचाल रजिस्टर, जंगम मालमत्ता नोंदवही, अपिलीय अधिकाऱ्याची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.
सहाय्यक गट विकास अधिकारी सेवक थोरात यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT