पिंपरी-चिंचवड

मनरेगा मजुरांसाठी ‘फेस ई-केवायसी’ अनिवार्य

CD

वडगाव मावळ, ता. ६ : केंद्र शासनाच्या नव्या निर्णयामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)अंतर्गत मजुरांची पारंपरिक हजेरी पद्धत आता रद्दबातल होणार असून मनरेगा मजुरांसाठी ‘फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी’ प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. मजुरांची उपस्थिती नोंदवण्यासाठी मजुरांचा चेहरा ओळखूनच हजेरी स्वीकारली जाणार आहे. मावळ तालुक्यात गेल्या महिनाभरात सुमारे ३१ टक्के मजुरांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित मजुरांनी ती त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मनरेगा योजनेंतर्गत होणाऱ्या बोगस मजुरांच्या नोंदी, बनावट हजेरी आणि निधी अपहारास आळा घालण्यासाठी शासनाने ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी सांगितले की, आत्तापर्यंत मजुरांची उपस्थिती रोजगार सेवकांकडून नोंदवली जात होती. मात्र, अनेक ठिकाणी मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींच्या नावावर हजेऱ्या लावल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने ही प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. फेस ई-केवायसीसाठी आधारकार्ड व मोबाईल क्रमांक लिंक असणे बंधनकारक असून ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर या प्रक्रियेसाठी विशेष मोहीम राबवून मजुरांना प्रशिक्षणही दिले जात आहे. या प्रक्रियेमध्ये हजेरीसाठी मजुरांना मोबाईल ॲपद्वारे स्वतःचा फोटो अपलोड करावा लागतो. जो थेट केंद्रीय सर्व्हरवर नोंदवला जातो. या पद्धतीमुळे मजुरांची खरी उपस्थिती सुनिश्चित होईल. कामाचे पारदर्शक वितरण साध्य होईल आणि निधीचा योग्य वापर सुनिश्चित होईल असा विश्वास आहे. नवीन हजेरीमुळे बोगस मजुरांची संख्या घटेल कारण आजपर्यंत काही ठिकाणी बोगस मजूर दाखवून बनावट हजेरी लावली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. फेस ऑथेंटिकेशनमुळे या प्रकारांना पूर्णविराम मिळणार आहे. हजेरी फक्त उपस्थित व्यक्तीच्या चेहऱ्याशी जुळल्यानंतरच लागू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी घेतलेला फोटो थेट आधार डेटाबेसशी जोडून तपासला जाईल. मजुराचा चेहरा जुळल्यानंतरच हजेरीपत्रक तयार होईल. त्यामुळे कोणाच्याही नावावर खोटी उपस्थिती नोंदवणे अशक्य होईल. प्रत्येक मजुरासाठी फेस ई-केवायसी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी कामगारांना आपला आधार क्रमांक नोंदवून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ज्यांचे ई-केवायसी पूर्ण नसेल त्यांची उपस्थिती प्रणालीमध्ये नोंदवली जाणार नाही. ई-केवायसी प्रक्रिया स्थानिक ग्रामपंचायत, गटविकास कार्यालय, बँक शाखा किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथे करता येईल. त्यासाठी मजुरांनी आपला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सोबत नेणे आवश्यक आहे.
नवीन प्रणालीमुळे मजुरांची अचूक संख्या, त्यांचे प्रत्यक्ष उपस्थिती तास तसेच वेतन वितरणात पारदर्शकता येणार आहे. मावळ तालुक्यात गेल्या महिनाभरात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे चार हजार मजुरांपैकी ३१ टक्के मजुरांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

‘‘मनरेगा योजनेअंतर्गत पारदर्शकता वाढवण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे.
यामुळे बनावट मजूर दाखवण्याचे प्रकार थांबतील आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांनाच लाभ मिळेल. संपूर्ण राज्यामध्ये मनरेगा ई केवायसी करून घेण्याची प्रक्रिया चालू असून पुणे जिल्ह्यामध्ये ई केवायसीमध्ये मावळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे. यापुढे ई केवायसी झाल्याशिवाय मजुरांना मस्टरवर घेता येणार नाही. त्यामुळे सर्व ॲक्टिव्ह जॉब कार्ड धारकांनी आपापल्या ग्रामपंचायतमध्ये ग्राम रोजगार सहाय्यक अथवा ग्रामविकास अधिकारी यांच्या मदतीने तातडीने ई केवायसी करून घ्यावी.
- कुलदीप प्रधान, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मावळ
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Eknath Shinde : चाकणला उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; लाडकी बहिण योजना बंद होणार नाही!

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT