पिंपरी-चिंचवड

उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

CD

वडगाव मावळ, ता.१० : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह १७ प्रभागांतील १७ नगरसेवकपदांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था वडगाव नगरपंचायतीमध्ये करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी https://mahaseccles.in// या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये स्वतःची नोंदणी करुन घ्यावी. नामनिर्देशपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी.
वडगाव नगरपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सात टेबलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यात अनामत रक्कम, नगराध्यक्ष, तपासणी पथके, अर्ज स्वीकृती पथक व संगणकीकरण व छपाई पथक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नामनिर्देशन प्राप्त करणाऱ्या पथकांमध्ये वडगाव नगरपंचायत, पंचायत समिती तसेच तहसीलदार कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तेलभाते व सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी निवडणूक विषयक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्थिर व देखरेख पथक, भरारी पथकांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये उपस्थित सर्व कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT