पिंपरी-चिंचवड

रायगड सहलीला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वडगाव मावळ, ता. २३ : मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत काम करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींसाठी मोफत रायगड दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. सुमारे चारशे शिक्षक या सहलीत सहभागी झाले होते.
या सहलीत रायगड येथील शिवसमाधीचे दर्शन, पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन तसेच महाडच्या चवदार तळ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन आदी स्थळांचा समावेश होता. सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचा रायगडवर सन्मान करण्यात आला. दिग्दर्शक प्रवीण तरडे, राज देशमुख, राजेंद्र खातू, नरेंद्र फोंडके उपस्थित होते. कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या शिवाजी महासम्राट या कादंबरी मालिकेतील तिसरा खंड ‘आसमान भरारी’ या हस्तलिखिताचे मेहता प्रकाशनाचे प्रमुख अखिल मेहता यांच्याकडे हस्तांतरण सोहळा संपन्न झाला. दुर्गप्रेमी सहदेव डोंबे, सचिन ढोबळे, गोकूळ लोंढे, संदीप शिवदे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थापक शिवाजी ठाकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष बाबासाहेब औटी यांनी आभार मानले. राहुल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संस्थापक राजू भेगडे, शिवाजी ठाकर यांनी संयोजन केले. मनोज भांगरे, संदीप गाडे, रघुनाथ मोरमारे, तानाजी शिंदे, गोरक्ष जांभूळकर, अमोल चव्हाण, सुहास धस, ज्ञानेश्वर शिवणेकर, धोंडीबा घारे, संजय ठुले, अजिनाथ शिंदे, अंकुश मोरमारे व संतोष राणे आदींनी सहकार्य केले.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Solapur Police : पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल; मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा निर्णय!

महिन्याभरापूर्वी लग्न, पण महिला दीड महिन्यांची गर्भवती; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

Weekly Horoscope Prediction : ह्या आठवड्यात 'या' मूलांकाच्या लोकांना मिळणार यश तर 'या' मूलांकाला आहे धोका !

Pankaja Munde PA Anant Garje Wife Gauri Garje यांनी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबियांना घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT