पिंपरी-चिंचवड

वडगावात बिबट्याचा वाढता वावर

CD

वडगाव मावळ, ता. २८ : गेल्या चार पाच दिवसांपासून येथील केशवनगर भागात बिबट्याचा वावर वाढल्याने व त्याने गुरुवारी रात्री पगडेवस्ती जवळून कुत्र्याला ओढून नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन या परिसरात दोन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असल्याची माहिती वडगाव मावळचे वनपरिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ यांनी दिली.

दीड महिन्यांपूर्वी सांगवी रस्त्यालगतच्या (खोपरेओढा) दिनेश पगडे यांच्या शेताजवळ बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ओढून नेले होते. त्यानंतर गेल्या चार पाच दिवसांपासून जवळच्या केशवनगर परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत आहे. केशवनगर भागाच्या उत्तरेला सांगवी गावालगत ऊसशेती व गवताळ माळरान आहे. त्यात बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे. गेल्या आठवड्यात खापरे ओढ्यावरील बंधारा परिसरात धनगरांना बिबट्या दिसला होता. सोमवारी मध्यरात्री याच भागातील पवार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर राहुल पवार या तरुणाला बिबट्या दिसला. गुरुवारी दुपारी जितेंद्र ढोरे यांना त्यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले. तर रात्री पगडे वस्ती जवळून पुन्हा त्याने कुत्रे ओढून नेले. या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या परिसरात नागरी वस्तीचा मोठा विस्तार झालेला आहे. त्यामुळे बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन वनपरिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ व त्यांच्या पथकाने येथे भेट दिली. त्यांना बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असून, अधिक खात्री करण्यासाठी या परिसरात दोन ठिकाणी त्यांनी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यात त्याचे स्थान निश्चित झाल्यानंतर पिंजरा लावण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मावळात वीस किलोमीटर परिसरात वावर
वनपरिमंडळ अधिकारी हिरेमठ यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पावसाळ्यानंतर गवत व ऊस पिकाची वाढ झाल्यानंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या आढळून आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यात वडगावसह (केशवनगर) वारंगवाडी, कातवी, सांगवी, नवलाख उंबरे, आंबी, बेलज, नानोलीतर्फे चाकण, धामणे, गोडुंब्रे, साळुंब्रे, चांदखेड, सांगवडे, पुसाणे आदी गावांचा समावेश आहे. तक्रारीनुसार बिबट्याचा वावर तेथे आढळून आला आहे. तीन चार महिन्यांत बिबट्याने बारा शेळ्या, मेंढ्या व वासरांवर हल्ला केला. संबंधितांना नुकसान देण्याबाबतचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवले आहेत. मानवावर हल्ला केल्याची एकही तक्रार दाखल नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नानोलीतर्फे चाकण येथे माणसावर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, तो बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एक बिबट्याचे सुमारे वीस किलोमीटर अंतरापर्यंतचे कार्यक्षेत्र असते. त्यामुळे सर्व गावांमध्ये दिसलेला बिबट्या एकच असण्याची शक्यता आहे. बिबट्याप्रवण क्षेत्रात अनेक गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. गावोगावी पोस्टर्स लावले आहेत.

काय काळजी घ्यावी
- शेतकऱ्यांनी घराच्या परिसरातील गवत काढून स्वच्छता करावी
- परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा
- रात्री ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना एकटे घराबाहेर सोडू नये
- पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवावी
- कामानिमित्त घराबाहेर पडणे जरुरीचेच असल्यास हातात टॉर्च, काठी व हातात मोबाईलवर गाणी लावून ठेवावीत
- बिबट्या आढळून आल्यास त्याचा पाठलाग करून त्याला डिवचू नये
- कोणत्याही अफवा व खोटे व्हिडिओ व्हायरल करू नयेत
- बिबट्या आढळून आल्यास वनविभागाशी (टोल फ्री क्रमांक १९२६) त्वरित संपर्क साधावा

वडगाव मावळ : येथील केशवनगर परिसरात बिबट्याच्या शोधासाठी लावलेले ट्रॅप कॅमेरे.

साळुंब्रे : बिबट्यापासून खबरदारी घेण्याबाबत जनजागृती कार्यक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

बापरे! अभिनेता शशांक केतकर बेपत्ता, सिद्धार्थ जाधव घेऊन फिरतोय मिसिंगचे पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT