पिंपरी-चिंचवड

वडगावात रांगा लावून उत्साहात मतदान

CD

वडगाव मावळ, ता. २ : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अतिशय उत्साहाच्या वातावरणात मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तब्बल ६१.४५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पडली.
नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी सहा ठिकाणी २४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत असल्याने दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांनीही बूथ उभारले होते. तेथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. विशेषतः रमेशकुमार साहनी, न्यू.इंग्लिश स्कूल, पोदार स्कूल या ठिकाणी परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. बूथवर कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्र शोधून देण्यासाठी मदत करत होते. उमेदवार मतदारांना हात जोडून आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करत होते. उमेदवारांचे कार्यकर्ते प्रभागामध्ये जाऊन मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत होते. बाहेरगावी स्थलांतरित झालेल्या मतदारांनाही येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणुकीत चुरस असली तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. मतदान केंद्र परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मतदान केंद्रांवर वृद्ध व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची, पिण्याच्या पाण्याची, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था होती. निवडणुकीतील चुरस लक्षात घेऊन पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मतदारांमध्ये उत्साह
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत ११ टक्के मतदारांनी मतदान केले होते. नंतर मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले. साडेअकरापर्यंत २८.३३ टक्के, दीडपर्यंत ४६ टक्के तर दुपारी साडेतीनपर्यंत एकूण १० हजार १८४ पुरुष मतदारांपैकी ६ हजार १७४ तर एकूण ९ हजार ६६३ महिला मतदारांपैकी ६ हजार १८ अशा एकूण १९ हजार ८४७ मतदारांपैकी १२ हजार १९२ (६१.४३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारपर्यंत हक्काचे असलेले मतदार उरल्याने त्यानंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावला. संध्याकाळी काही मतदान केंद्रांवर पुन्हा काहीशी गर्दी वाढली होती. साडेपाचपर्यंतच्या निर्धारित वेळेत सर्वच केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. अप्पर जिल्हाधिकारी सुनील माळी, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी सर्व मतदान केंद्रांशी समन्वय ठेवून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

विशेष मतदान केंद्रांची व्यवस्था
वडगाव येथील रमेशकुमार सहानी स्कूल मधील ७/२ क्रमांकाचे मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून तर केशवनगर जिल्हा परिषद शाळेतील १/१ क्रमांकाचे केंद्र हे महिला मतदान केंद्र म्हणून सुशोभित करण्यात आले होते. काही मतदान केंद्रांच्या बाहेर सेल्फी पॉइंटची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे हौशी मतदार उत्साहाने सेल्फी काढून घेत होते. प्रथम मतदान करणाऱ्या युवा मतदारांसह १०० वर्षांपर्यंतच्या अनेक वृद्ध, दिव्यांग मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात आनंदाने सहभाग घेतला. येथील मुथा कुटुंबीयांतील शांताबाई आनंदराम मुथा (वय ८९) या आजीबाईंचे सोमवारी रात्री निधन झाले. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कारानंतर झाल्यानंतर या कुटुंबीयाने मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT