पिंपरी-चिंचवड

साडेपाच लाखांचे दागिने तोतया पोलिसांकडून लंपास

CD

वडगाव मावळ, ता. १० : कान्हे गावच्या हद्दीत दोन तोतया पोलिसांनी एका महिलेच्या अंगावरील आठ तोळे सोन्याचे पाच लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. बुधवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी शामल महेंद्र कर्नावट (रा.आदर्श कॉलनी, अहिल्यानगर) यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शामल व त्यांचा भाऊ वडगावहून दुचाकीवरून लोणावळ्याला जात होते. कान्हे फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला तोंडाला मास्क लावून थांबलेल्या दोन जणांनी त्यांची दुचाकी अडवली. ‘या मार्गावर सकाळपासून सोनसाखळी ओढण्याचे दोन-तीन प्रकार घडले आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही तपासणी करीत आहोत. तुम्ही अंगावरचे सोने काढून दाखवा. आम्हाला यादी करायची आहे,’ अशी बतावणी त्यांनी केली. त्यांनी दोन तोळ्यांची सोन्याची माळ, चार तोळे सोन्याच्या बांगड्या काढून एका कागदात गुंडाळून ठेवण्यास फिर्यादींना सांगितले. त्यानंतर हातचलाखी करून त्यांनी त्यातील दागिने काढून कागदात पिवळ्या रंगाचे बेंटेक्सचे हातकडे गुंडाळून ठेवले. तो कागद आरोपींनी हातात देताच संशय आल्याने फिर्यादींनी उघडून पाहिले. त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात येईपर्यंत दोघे त्यांच्याकडील दुचाकीवरून भरधाव वेगाने निघून गेले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कैलास कदम तपास करीत आहेत.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT